बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत या भाजपाच्या तिकीटावर हिमाचल प्रदेशातील मंडी येथून लोकसभा निवडणूक लढवून नुकत्याच खासदार झाल्या आहेत. गुरुवारी दिल्लीला जाण्यासाठी त्यांनी चंदीगड येथील विमानतळावर आगमन केले. त्यांना विस्ताराच्या फ्लाईटने त्यांना दिल्लीला पोहचायचे होते. त्यावेळी त्यांनी सुरक्षा तपासणीतून जात असताना सीआयएसएफच्या महिला जवानाने त्यांच्या कानाखाली वाजविल्याने खळबळ उडाली. या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या आणि संबंधित महिला जवानाला अटक करण्यात आली. कोण आहेत या सीआयएसएफच्या महिला जवान कुलविंदर कौर पाहूयात…
कंगना रणौत यांना विस्ताराच्या फ्लाइटने ( UK707 ) चंदिगडहून दिल्लीला जायचे होते. चंदिगड विमानतळावर सिक्युरिटी चेकनंतर त्या फ्लाइटमध्ये बोर्डिंगसाठी जाता असतानाच त्यांच्या जवळ आलेल्या एअरपोर्टवरील CISF यूनिटच्या महिला जवान कुलविंदर कौर यांनी अभिनेत्री आणि खासदार असलेल्या कंगना हीच्या कानाखाली मारली. त्यानंतर एकच खळबळ उडाली. कंगनाच्या सोबत असलेल्या मयंक माथुर यांनी देखील कुलविंदर कौर यांना कानाखाली मारण्याचा प्रयत्न केला.
kangana video statement here –
Shocking rise in terror and violence in Punjab…. pic.twitter.com/7aefpp4blQ
— Kangana Ranaut (Modi Ka Parivar) (@KanganaTeam) June 6, 2024
चंडीगढ़ एयरपोर्ट अथॉरिटीने कुलविंदर कौर हिला ताब्यात घेतले आहे.या प्रकरणाच्या तपासणीसाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. प्राथमिक तपासानंतर या सीआयएसएफच्या महिला जवानाला निलंबित केले आहे. तर चंडीगढ़ एयरपोर्टवर कर्टन एरियात CISF च्या महिला जवान कुलविंदर कौर यानी आपल्याशी वाद घातला आणि आपल्या कानाखाली मारल्याचा दावा खासदार कंगना रणौत यांनी केला आहे.
कुलविंदर कौर पंजाबच्या सुल्तानपुर लोधी येथील राहणाऱ्या आहेत. त्या सध्या मोहालीतील, सेक्टर 64, फेज एक्समध्ये राहतात. त्यांचे कुटुंब शेतकरी आहे. त्यांच्या कुटुंबिय शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झाले होते. सध्या कुलविंदर यांची पोस्टींग चंडीगड इंटरनॅशनल एयरपोर्टच्या इंटर्नल सिक्युरिटीत होती. या प्रकरणात कौर यांनी देखील आपले म्हणणे मांडले आहे. 100-100 रुपयांत महिला तेथे आंदोलनासाठी बसल्या आहेत असा दावा कंगना यांनी केल्याचे आरोपी कौर यांनी दिलेल्या जबाबात म्हटले आहे. कुलविंदर कौर म्हणाल्या की कंगना तेथे आंदोलनाला बसली होती का ?. माझी आई तेथे आंदोलनाला बसली होती. कंगानाच्या टिका टिपण्णीने कुलविंदर कौर या नाराज झाल्याचे त्यांच्या जबाबावरुन दिसत आहे. या घटनेनंतर कंगना यांनी तिचे म्हणणे एका व्हिडीओद्वारे जारी केले आहे.