भारतात गुणवंत कलाकारांची विशेषत: उत्तमोत्र गायकांची काही कमी नाही. देशातील तरूण आणि गुणवान गायिकांचा विषय निघताच श्रेया घोषाल, सुनिधी चौहान, नेहा कक्कर, अरिजित सिंग यांच्या नावाचा लगेच उल्लेख होतो. त्या गायकांनी आपली कला आणि मेहनतीच्या बळावर एकाहून एक सरक गाणी गात आपला मोठा फॅन बेस बनवला आणि त्यासोबतच भरपूर पैसाही कमावला. ए. आर. रहमान हा भारतातील सर्वात श्रीमंत गायक आहे ज्याची एकूण संपत्ती 1728 कोटी रुपये आहे. पण देशातील सर्वात श्रीमंत महिला गायिका कोण आहे तुम्हाला माहित आहे का ?
सर्वात श्रीमंत गायिका असं म्हणताच अनेकांच्या डोक्यात सुनिधी चौहान, श्रेया घोषाल किंवा नेहा कक्कर यांचा नाव डोळ्यासमोर आलं असेल. पण या तिघींपैकी कोणीच या यादीत अव्वल स्थानी नाहीये. भारतात सर्वात जास्त संपत्ती असलेली, महिला गायिका अवघई 34 वर्षांची असून तिने एकाहून एक अशी हिट गाणी दिली आहेत.
210 कोटींची मालकीण आहे ही गायिका
ही गायिका कोणी दुसरी तिसरी नसून भारतीय प्लेबॅक सिंगर, रेडिओ जॉकी आणि संगीतकार तुलसी कुमार ही आहे. तुलसी ही T-Series च्या मालकांच्या कुटुंबातील एक असून तिच्याकडे अफाट संपत्ती आहे. तुलसी कुमार T-Series च्या YouTube चॅनेल Kids Hut ची मालकही आहे. ती तिच्या प्रत्येक गाण्यासाठी 7 ते 10 लाख रुपये आकारते. इंडिया टाइम्सच्या वृत्तानुसार, तुलसी कुमार हिची एकूण संपत्ती 210 कोटी रुपये आहे.
या दिग्गजांना दिली मात
तिच्याकडे असलेल्या कोट्यवधींच्या संपत्तीमुळे तुलसी कुमार भारतातील सर्वात श्रीमंत गायिका बनली आहे. तिने अनेक दिग्गज गायकांना मात दिली आहे. तुलसीनंतर श्रेया घोषाल ही भारतातील दुसरी सर्वात श्रीमंत महिला गायिका आहे. रिपोर्ट्सनुसार श्रेया घोशाल हिचे नेटवर्थ 180 ते 185 कोटी इतके आहे. तर तिसऱ्या स्थानी आहे प्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान, तिचे नेटवर्थ 100 ते 110 कोटी रुपये इतके आहे.