मुंबई : बॉलिवूडचे महानायक, दिग्गज अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांतीवर आहेत. काही दिवसांपूर्वी सेटवर झालेल्या दुखापतीनंतर त्यांनी काही काळ काम थांबवले होते. चाहते त्यांच्यासाठी प्रार्थना करत होते. अलीकडेच त्यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ सीझन 15 (KBC) या शोचा नवीन प्रोमो समोर आला आहे. जे पाहिल्यानंतर चाहत्यांच्या आनंदाला पारावार नाही. या शोच्या माध्यमातून पुन्हा एकदा बिग बींच्या चाहत्यांना दर आठवड्याला त्यांना पाहायला मिळणार आहे. मात्र काल रात्री बिग बींनी केलेल्या एका ट्विटमुळे (tweet) सर्वजण हैराण झाले. त्यांनी अक्षरश: हात जो़डून विनंती केली आहे.
अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. इन्स्टाग्राम, ट्विटर, त्यांचा ब्लॉग यावर ते नेहमी काही ना काही पोस्ट करत असतात, हेही सर्वांना माहीत आहेच. त्याच पार्श्वभूमीवर बिग बी यांनी काल रात्री 11 च्या सुमारास एक ट्विट करून त्यांच्या मनातील भावना व्यक्त केल्याय या ट्विटमध्ये त्यांनी खुद्द Twitter कडेच एक विनंती केली आहे. ‘ अरे, Twitter मालिक भैया , ये Twitter पे एक Edit button भी लगा दो please, बार बार जब गलती हो जाती है, और शुभचिंतक, बताते हैं हमें, तो पूरा Tweet, डिलीट करना पड़ता है, और गलत Tweet को ठीक कर के, फिर से छापना पड़ता है . हाथ जोड़ रहे हैं.’ अशा शब्दांत त्यांनी विनंती केली आहे.
T 4622 – अरे, Twitter मालिक भैया , ये Twitter पे एक Edit button भी लगा दो please !!!
बार बार जब ग़लती हो जाती है, और शुभचिंतक, बताते हैं हमें, तो पूरा Tweet, delete करना पड़ता है, और ग़लत Tweet को ठीक कर के, फिर से छापना पड़ता है ।
हाथ जोड़ रहे हैं ?— Amitabh Bachchan (@SrBachchan) April 19, 2023
बिग बी हे ट्विटरवर बऱ्याच वेळेस पोस्ट शेअर करत असतात. पण ते करताना काही वेळेस एखादी चूक होते. त्यांचे चाहते, शुभचिंतक ही गोष्ट लक्षात आणून देतात, मात्र ती चूक सुधारण्यासाठी बिग बींना संपूर्ण Tweet डिलीट करावे लागते. आणि पुन्हा नवे ट्विट पोस्ट करावे लागते. म्हणूनच अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर एक Edit button लावण्याची अथवा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. थोडक्यात काय तर ट्विट करताना चूक झाल्यास ते एडिट करून सुधारता येत नाही, त्यासाठी आधीचे पूर्ण ट्विट डिलीट करून, सुधारणा केलेले नवे ट्विट टाकावे लागते. हा त्रास फक्त जनसामान्यांनाच नव्हे तर अमिताभ बच्चन यांनाही सहन करावा लागतो, म्हणूनच त्यांनी ट्विटरला हात जोडून विनंती करत ही मागणी केली आहे.
बिग बीं च्या प्रकृतीत सुधारणा
दरम्यान आता अमिताभ बच्चन यांची तब्येत बरी आहे. ‘प्रोजेक्ट के’ या आगामी चित्रपटाच्या सेटवर काही महिन्यांपूर्वी त्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना बेड रेस्ट घेण्यास सांगितले होते. खुद्द बिग बी देखील त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या तब्येतीचे अपडेट्स देत होते. मात्र आता पुन्हा एकदा अमिताभ बच्चन छोट्या पडद्यावर आपल्या चाहत्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. याशिवाय त्यांच्याकडे अनेक चित्रपट आहेत ज्यासाठी त्यांना शूटिंग सुरू करायचे आहे. ज्यावेळी बिग बी पडद्यावर दिसतात तेव्हा चाहत्यांना आनंद होतो.