दुर्गा जसराजला मातृशोक, पंडित जसराज यांची पत्नी मधुरा जसराज यांचे निधन

| Updated on: Sep 25, 2024 | 8:42 AM

विख्यात (दिवंगत) गायक पंडित जसराज यांची पत्नी आणि दुर्गा जसराज हिची आई मधुरा पंडित जसराज यांचं निधन झालं. बुधवारी ( 25 सप्टेंबर) पहाटेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या.

दुर्गा जसराजला मातृशोक, पंडित जसराज यांची पत्नी मधुरा जसराज यांचे निधन
मधुरा पंडित जसराज यांचं निधन
Image Credit source: social media
Follow us on

विख्यात (दिवंगत) गायक पंडित जसराज यांची पत्नी आणि दुर्गा जसराज हिची आई मधुरा पंडित जसराज यांचं निधन झालं. आज ( बुधवार, 25 सप्टेंबर) पहाटेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. 1962 साली मधुरा जसराज यांचे पंडित जसराज यांच्याशी लग्न झालं. त्यांच्या पश्चात दुर्गा जसराज आणि श्रीरंग देव पंडित अशी मुलं आहेत. त्यांच्या निधनामुळे कुटुंबाला धक्का बसला असून मनोरंजन सृष्टीवरही शोककळा पसरली आहे. आज दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

मुलगी दुर्गा जसराज शोकाकुल असून मधुरा यांच्या निधनाच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला. माझ्या आईचे वडील, विख्यात दिग्दर्शक व्ही. शांताराम आणि माझे वडील पंडित जसराज या दोघांच्या वारशाचे डॉक्युमेंटेशन करण्यात आणि ते पुनर्संचयित करण्यात आईचा अतिशय मोठा वाटा होता, असे दुर्गा यांनी नमूद केलं.

मधुरा जसराज यांची कारकीर्द

मधुरा जसराज या स्वत: दिग्दर्शिका, लेखिका, कोरिओग्राफर आणि प्रोड्युसर होत्या, त्यांनी अनेक काळ मराठी चित्रपटसृष्टीत काम केलं. भारतीय शास्त्रीय संगीताचे जतन आणि संवर्धन करण्यात मधुरा यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. 2009 साली मधुरा यांनी त्यांचे पती, विख्यात गायक पंडित जसराज यांच्यावरील ‘संगीत मार्तंड पंडित जसराज’ या डॉक्युमेंटरीचे दिग्दर्शन केले.

एक उत्तम लेखिका असणाऱ्या मधुरा जसराज यांनी त्यांचे वडील, भारतीय चित्रपट उद्योगाचे प्रणेते, व्ही शांताराम यांच्या चरित्राचे तसेच इतर अनेक कादंबऱ्यांचेही लेखन केले.

2010 साली त्यांनी ‘आई तुझा आशीर्वाद’ हा मराठी चित्रपटही दिग्दर्शित केला. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सनुसार, फिचर फिल्ममध्ये त्यांनी सर्वात ज्येष्ठ दिग्दर्शिका म्हणून पदार्पण करत इतिहास रचला.