नवी दिल्ली | 6 फेब्रुवारी 2024 : दोन सिनेतारकांची ही प्रेमकहाणी ‘हिरो’ जॅकी श्रॉफ यांच्या आयुष्यात घडली. जॅकी श्रॉफ याची पत्नी आयशा श्रॉफ ही अवघ्या 13 वर्षांची असताना त्यांची पहिली भेट एका चाळीत झाली. दोघांमध्ये सामान्य संभाषण झाले, त्यानंतर त्यांची प्रेमकहाणी सुरू झाली. ती एका श्रीमंत कुटुंबातील तर हिरो मुंबईतील चाळीत वाढलेला. याच सामाजिक स्थितीचा विचार करून आयशा हिच्या कुटुंबीयांनी त्याला विरोध केला. पण, आयशा आपल्या मतांवर ठाम होत्या. पण, यात एक ट्विष्ट आला.
आयशा हिचा पहिला चित्रपट ‘तेरी बहाओं में’ हा फ्लॉप झाला. त्यानंतर त्यांनी या क्षेत्रात पुन्हा पाय ठेवला नाही. जॅकी श्रॉफ याचे नाव तोपर्यंत झाले होते. पण. आयशा आणि जॅकी श्रॉफ यांच्या प्रेमाला घरून विरोध होता. म्हणून आयशा आणि जॅकी श्रॉफ यांनी अभिनेत्याच्या वाढदिवशी लग्न केले.
जॅकी श्रॉफ याने काही काळाने एका मुलाखतीमध्ये सिमी ग्रेवाल हिच्यासोबतच्या नात्याबद्दल जाहीर सांगितले. त्यावेळी सिमी ग्रेवाल ही अमेरिकेत रहात होती. सिमी हिने भारतात पुन्हा येण्याचा निर्णय घेतला त्यावेळी आयशा हिने तिला पत्र लिहिले. आपल्या पतीच्या मैत्रिणीला दुसरी पत्नी बनवण्यास तयार होती असे तिने म्हटले.
आपण दोघी बहिणींप्रमाणे एकत्र राहू शकतो. जॅकी श्रॉफशी लग्न करू शकता असा प्रपोज आयशाने तिच्या पतीच्या एक्स गर्लफ्रेंडसमोर ठेवला होता. आयशा त्यावेळी जॅकी श्रॉफ याच्या खूपच प्रेमात होती. खरं तर, तिला आपले जॅकीवर किती प्रेम आहे हेच यातून सांगायचे होते.
जॅकी श्रॉफ आणि त्यांची पत्नी आयशा यांनी त्यांची मुलगी कृष्णा श्रॉफ हिच्या यूट्यूब चॅनेलवर त्यांच्या प्रेमकथेच्या अनेक अज्ञात पैलूंबद्दल खुलासा केला आहे. जॅकी श्रॉफ यांचे वय 67 वर्ष आहे तर आयशा श्रॉफ या 63 वर्षाच्या आहेत.
आयशा या खुलाशावर म्हणाल्या, ‘मला माहित नाही तेव्हा मी काय विचार करत होते. मी ते केले यावर माझा विश्वास बसत नाही. पण, गोष्ट अशी होती की मला त्यांना कसे तरी मिळवायचे होते. माझ्याकडे जॅकीला सोडण्याचा किंवा त्याच्या माजी मैत्रिणीसह त्याला स्वीकारण्याचा असे दोनच पर्याय होते असे त्यांनी सांगितले.