छोट्या पडद्यावरील अर्थात टीव्हीवरील प्रसिद्ध कपल असलेले दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिय यांना परदेशात एक भयानक अनुभव आला असून ते दोघेही संकटात सापडले आहेत. लग्नाचा 8 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी विवेक आणि दिव्यांका दोघेही युरोप टूरवर गेले होते. ते मजेत फिरलेदेखील, पण तेथेच त्यांना चोरांचा मोठा फटका बसला. इटलीमध्ये फिरत असताना एका शहरात विवेक-दिव्यांकाच्या पासपोर्ट, क्रेडिट कार्डसह महागड्या वस्तूवर चोरांनी डल्ला मारला आहे. त्यामुळे परदेशात दोघेही संकटात सापडले असून या प्रकरणी पोलिसांनी देखील हतबलता दाखवली असल्याचा आरोप दिव्यांका-विवेकने केला आहे.
दिव्यांका-विवेकचं सामान झालं चोरी
लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सध्या परदेशात फिरत असलेल्या दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया या दोघांनी त्यांच्या युरोप ट्रीपचे शानदार फोटो सोशल मीडियावर नुकतेच शेअर केले होते. मात्र तेथेच त्यांना एक वाईट अनुभवही आलाय. तेथे या जोडप्याला चोरांनी लुटलं. शॉपिंग करून खरेदी केलेल्या सर्व वस्तू, पर्स, पासपोर्ट यासह या जोडप्याचं सुमारे 10 लाखांचं सामान चोरीला गेला. यासंदर्भात दिव्यांकाचा पती आणि अभिनेता विवेक दहियाने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर करत आपबिती सुनावली. या जोडप्याचं सामान ज्या कारमध्ये ठेवलं होतं, चोरांनी त्याच कारची काच फोडून सर्व सामान लुटलं. त्याची भीषणता या व्हिडीओत दिसत असून गाडीमध्ये काचांचा खच पडला असून इतर सर्व सामान अस्ताव्यस्त पद्धतीने पडलेलं होतं.
दिव्यांकाचा पती विवेक दहियाने म्हणाला की,’या प्रवासात ही घटना सोडली तर बाकी सर्व काही अप्रतिम होते. आम्ही काल फ्लॉरेन्सला पोहोचलो आणि एक दिवस तेथेच राहण्याचा बेत केला. आम्ही आमच्या मुक्कामासाठी एका हॉटेलमध्ये गेलो, तर आमचं सर्व सामान बाहेर पार्क केलेल्या कारमध्ये ठेवलं होते. पण नंतर जेव्हा आम्ही सामान घेण्यासाठी कार जवळ आलो तेव्हा आमची कार फोडली असल्याचे दिसले. त्या कारमध्ये ठेवलेला आमच्या दोघांचा पासपोर्ट, पर्स, खरेदी केलेल्या सर्व महागड्या मौल्यवान वस्तू गायब झाल्याचं लक्षात आलं आणि धक्काच बसला. त्या कारमध्ये फक्त आमचे काही जुने कपडे आणि खाद्यपदार्थ कारमध्ये तसेच ठेवले होते, हीच त्यातल्या त्यात बरी गोष्ट असे विवेकने सांगितलं.
भारतात यायचं कसं ? जोडपं परदेशातच अडकलं
आम्हाला भारतात परत येण्यासाठी मदतीची गरज आहे, असंही विवेकने नमूद केलं. या घटनेनंतर आम्ही तेथील स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला, पण त्यांनी आमची तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला, तिथून आम्हाला काहीच मदत मिळाली नाही. सीसीटीव्ही फुटेज नसेल तर आम्ही काहीच करू शकत नाही, असे म्हणत पोलिसांनी सरळ हात वर केले, असं पोलिसांनी आम्हाला सांगितलं. त्यानंतर आम्ही फ्लॉरेन्सजवळील एका शहरात पोहोचले आणि तेथील एका हॉटेलमधील स्टाफ आमची मदत करत आहे. पण आता सगळं सामान, पर्स गेल्याने आमच्याकडे पुरेसे पैसेही नाहीत असंही विवेकने नमूद केलं.
8 जुलै रोजी दिव्यांका-विवेक त्यांच्या लग्नाचा आठवा वाढदिवस साजरा करण्यासाठी युरोपच्या सहलीवर गेले होते. येथूनच दिव्यांकाने विवेकसोबत काही रोमँटिक फोटो शेअर केले आणि त्याला शुभेच्छाही दिल्या. या फोटोंमध्ये विवेक आणि दिव्यांकाने वेगवेगळ्या ठिकाणी पोज दिल्या होत्या. दोघांचे क्यूट आणि रोमँटिक फोटो व्हायरल झाले होते.