सध्या देशभरात कोरोनानं डोकं वर काढलंय. अशा परिस्थितीत प्रत्येक जण होईल तेवढी मदत करतंय. अशात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसनं मदतीचा हात पुढे केलाय. तिनं समाजाच्या तळागाळात पोहोचून काम करण्यासाठी नुकतीच एका फाउंडेशनची सुरुवात केली.
तिनं स्थापन केलेल्या 'यू ओन्ली लिव्ह वन्स' (YOLO) या फाउंडेशन अनेक स्वयंसेवी मिळून काम करणार आहे.
अभिनेत्रीने ‘रोटी बँक फाउंडेशन’ सोबत मिळून एकत्रपणे काम करता यावे या उद्देशाने नुकतंच ‘रोटी बँक फाउंडेशन’च्या स्वयंपाकघराला भेट दिली.
रोटी बँक टीम आणि आपली YOLO टीमसोबत जॅकलीनने त्या ठिकाणी जेवण बनवण्याच्या प्रक्रियेत सहयोग दिला आणि त्या माध्यमातून गरजूंना अन्न वाटप देखील केले.
सध्या सोशल मीडियावर जॅकलिनचं भरभरुन कौतुक करण्यात येतंय.