क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि कोरिओग्राफर धनश्री वर्मा यांनी अधिकृतपणे घटस्फोट घेतला आहे. वांद्रे कौटुंबिक न्यायालयात 20 मार्च रोजी धनश्री आणि युझवेंद्र यांच्या घटस्फोटावर निकाल लागला. युझवेंद्रने धनश्रीला 4.75 कोटी रुपये पोटगी म्हणून द्यायचे आहेत. चहलचे वकील नितीन गुप्ता यांनी धनश्री आणि युझवेंद्र यांच्या याचिकेवर सुनावणी करताना घटस्फोट मंजूर केल्याची पुष्टी केली. आता घटस्फोटानंतर धनश्री पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या दिसली. पापाराझींशीही बोलताना युझवेंद्रसोबतच्या घटस्फोटावर तिने प्रतिक्रिया दिली.
धनश्रीचा बोल्ड लूक
धनश्रीच्या लूकविषयी बोलायचे झाले तर तिने केस मोकळे सोडले आहेत. त्यावर सिंपल ज्वेलरी घातली आहे. ऑल ब्लॅक कट-आउट ड्रेसमध्ये धनश्री स्टायलिश दिसत होती. फोटोग्राफर फोटो काढत असताना धनश्री आनंदी दिसली. तिच्या चेहऱ्यावर स्मीतहास्य होते. तसेच ती तिचे ‘देखा जी देखा मैंने’ हे गाणे प्रमोट करताना दिसली.
काय म्हणाली धनश्री
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, एका पापाराझीने धनश्रीला विचारले, “मॅडम, तुम्हाला कालच्याबद्दल (घटस्फोटाच्या दिवसाबद्दल) काही सांगायचे आहे का?” या प्रश्नाने धनश्री वर्मा शांत झाली आणि तिने त्यावर उत्तर देण्यासही नकार दिला. त्यानंतर धनश्री म्हणाली की, “आधी माझे गाणे ऐका.” धनश्री आणि गाणे दोन्ही ट्रेंडमध्ये असल्याचेही तिने सांगितले.
धनश्रीच्या गाण्याविषयी
धनश्रीच्या या अल्बचे नाव ‘देखा जी देखा मैने’ असे आहे. या अल्बमची निर्मिती टी-सीरिजने केली असून ज्योती नुरन यांनी गायले आहे. तसेच जानी यांनी गाण्याला संगीत दिले आहे. जानी यांनी लिहिलेल्या या गाण्याचे बोलही अतिशय धारदार आहेत. ‘देखा जी देखा मैं, अपना का रोना देखा. गैरों के बिस्तर पे, अपनो का सोना देखा’ असे या अल्बमचे बोल आहेत. गाण्यात आणखी एक ओळ आहे, “दिल तेरा बच्चा है, निभाना भूल जाता है. नया खिलौना देख के, पुराना भूल जाता है.” एकंदरीतच धनश्रीचे हे गाणे चर्चेचा विषय ठरत आहे. गाणे राजस्थानमध्ये शूट करण्यात आले आगे. या गण्यात धनश्रीसोबत’पाताल लोक’ सीरिजमधील अभिनेता इश्वाक सिंग दिसत आहे. गाण्यात, हे दोघे एका राजेशाही जोडप्याच्या भूमिकेत आहेत. एका दृश्यात, पती आपल्या पत्नीला मित्रासमोर थप्पड मारतो आणि दुसऱ्या दृश्यात, तो तिच्यासमोर एका महिलेशी जवळीक साधतो. त्यामुळे हे गाणे पाहून नेटकरी चकीत धाले आहेत.