सलमान खानच्या सर्वात मोठ्या फ्लॉप चित्रपटामुळे अभिनेत्रीचे करिअर उद्ध्वस्त, एकही चित्रपट चालला नाही

| Updated on: Mar 24, 2025 | 8:11 PM

सलमान खानसोबत काम केलेल्या एका अभिनेत्रीचे करिअरचं नंतर उद्धवस्थ झाले. ही बॉलिवूड अभिनेत्री सलमान खानसोबत एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर आली पण त्यानंतर मात्र तिचं फिल्मी करिअरच पूर्णपणे बंद पडलं. कोण आहे ही अभिनत्री?

सलमान खानच्या सर्वात मोठ्या फ्लॉप चित्रपटामुळे अभिनेत्रीचे करिअर उद्ध्वस्त, एकही चित्रपट चालला नाही
Zareen Khan career
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

बॉलिवूडमध्ये येणाऱ्या अनेक अभिनेत्रींपैकी अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांना सलमान खानने त्याच्या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात येण्याची संधी मिळाली आहे. पण काही अभिनेत्री यशस्वी झाल्या आहेत, तर काही जणी बॉलिवूडपासून दूर झाल्या. पण अशी एक अभिनेत्री आहे जिचे फिल्मी आयुष्यचं उद्ध्वस्त झालं आहे.ही अभिनेत्री आहे जी स्वप्नांच्या शहरात, मुंबईत, एक आघाडीचा स्टार बनण्याच्या अपेक्षेने आली होती. तथापि, कठोर परिश्रम करूनही ती प्रेक्षकांचे मन जिंकू शकली नाही आणि नंतर ती बॉलिवूड इंडस्ट्रीतून पूर्णपणे गायब झाली.

‘वीर’ चित्रपटातून पदार्पण केले

ही अभिनेत्री म्हणजे जरीन खान. तिचा जन्म 14 मे 1987 ही एक भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल आहे तिने प्रामुख्याने हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. बॉलिवूड व्यतिरिक्त, ती पंजाबी, तेलुगू आणि तमिळ चित्रपटांमध्येही दिसली आहे. जरीनने सलमान खानसोबत ‘वीर’ चित्रपटातून पदार्पण केले.

नशिबाने साथ दिली नाही

तिच्या अभिनयाने सलमानचे लक्ष वेधून घेतलं आणि नंतर सलमानने ‘वीर’ मध्ये भूमिका देऊ केली. हा चित्रपट सलमान खानचा ड्रीम प्रोजेक्ट होता आणि तो मोठ्या पडद्यावर आणण्यासाठी त्याला बरीच वर्षे लागली. तथापि, नशिबाने त्याला साथ दिली नाही आणि वर्षानुवर्षे केलेले कष्ट क्षणार्धात वाया गेले. ‘वीर’ हा चित्रपट 63 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता आणि त्याने फक्त 46 कोटी रुपये कमावले. अशाप्रकारे, ते एक आपत्ती ठरले आणि निर्मात्यांना कोट्यवधींचे नुकसान झाले. चित्रपटातील गाणी लोकांना आवडली पण कथानक कोणालाही आवडले नाही.

अभिनय कारकिर्दीची घसरण

मनोरंजक गोष्ट अशी आहे की आयएमडीबीनुसार, सलमानने चित्रपटाची पटकथा तो बनण्याच्या 20 वर्षांपूर्वी लिहिली होती. अनिल शर्मा दिग्दर्शित ‘वीर’ चित्रपट अखेर प्रदर्शित झाला तेव्हा त्याचा निर्मिती खर्चही वसूल करण्यात त्याला अडचण आली.’वीर’ नंतर जरीनच्या अभिनय कारकिर्दीची घसरण झाली. जरी ती ‘हाऊसफुल 2’ आणि ‘वजह तुम हो’ या सारख्या चित्रपटांमध्ये दिसली असली तरी त्यापैकी कोणत्याही चित्रपटाने अपेक्षित कमाई केली नाही. 2010 ते 2018 पर्यंत, जरीन खान चित्रपट उद्योगात सक्रियपणे काम करत होती, परंतु तिच्या कोणत्याही चित्रपटाला यश मिळू शकले नाही. तिचा शेवटचा चित्रपट, ‘हम भी अकेले तुम भी अकेले’ 2021 मध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. पण त्यानंतर ती ना सलमानच्या संपर्कात दिसली, नाही कोणत्या कार्यक्रमाला.