नवी दिल्ली : होळीच्या दिवशी भांग किंवा थंडाई पिण्याची प्रथा (Bhang Thandai on Holi) फार जुनी आहे. भांग प्यायल्यावर लगेच त्याचा नशा चढत नाही, साधारण अर्ध्या तासानंतर त्याचा परिणाम होऊ लागतो आणि हळूहळू या नशेचा परिणाम माणसाच्या मनावर (brain) होऊ लागतो. त्याच्या मज्जासंस्थेवर परिणाम होतो, ज्यामुळे व्यक्ती स्वतःच्या क्रियांवरील नियंत्रण गमावू लागते. अशा स्थितीत माणूस हसायला लागला तर हसतच राहतो, किंवा रडायला सुरूवात झाली तर तो रडतच राहतो. एवढंच नव्हे तर काही पदार्थ खायला लागला तर तो खातच सुटतो. थोडक्यात भांग अथवा थंडाई (thandai) प्यायल्यानंतर एखादी क्रिया सुरू झाली तर तीच क्रिया बराच काळ कायम राहते.
ज्या व्यक्तींनी कधीही भांग प्यायली नसेल आणि त्यांना भांग असलेली थंडाई प्यायला दिल्यास, त्यांची अवस्था आणखीनच बिकट होते. म्हणूनच भांग घेतल्यानंतर काही चुका करणे टाळावे. जर ती व्यक्ती जागरूक नसेल तर त्या व्यक्तीच्या मित्रांनी अथवा हितचिंतकांनी त्याची काळजी घ्यावी, अन्यथा भांग वा थंडाई पिणे खूपच महागात पडू शकेल.
या चुका करणे टाळावे
1) रिकाम्या पोटी भांग अथवा थंडाई पिण्याची चूक बिलकूल करू नका. ती नेहमी दुधासोबत किंवा फक्त थंडाईच्या स्वरूपात सेवन करावी, जेणेकरून ती प्यायल्यानंतरही तुम्ही तुमच्या नियंत्रणात राहाल.
2) तुम्ही भाग अथवा थंडाई प्यायला असाल तर चुकूनही किंवा मजे-मजेत दारूचे सेवन करण्याची चूक करू नका. अन्यथा तुम्हाला त्यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागेल.
3) थंडाई अथवा भांग प्यायल्यावर गाडी अजिबात चालवू नका. कारण त्या नशेमध्ये माणसाला नीट शुद्ध नसते. तो काय करतोय याची कधीकधी जाणीव नसते. अशा परिस्थितीमध्ये गाडी चालवल्यास अपघात होण्याचा धोका खूप वाढतो.
4) भांग प्यायल्यानंतर गोड खाऊ नका, त्यामुळे थंडाई चढू शकते. अशा परिस्थितीत तुमची समस्या आणखी वाढू शकते.
5) थंडाई प्यायल्यानंतर कोणत्याही प्रकारचे औषध सेवन करू नका, अन्यथा रिॲक्शन होऊ शकते. अशा स्थितीत तुम्हाला डोकेदुखी, उलट्या किंवा पोटदुखीची समस्या जाणवू शकते.
भांग अथवा थंडाई जास्त झाल्यास काय करावे ?
– भांग अथवा थंडाई जास्त झाली असेल किंवा चढली असेल तर त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी संत्र किंवा द्राक्षं यासारखी लिंबूवर्गीय फळे खावीत. फक्त लिंबाचा रस अथवा चिंचेचे पाणी प्या. यामुळे चढलेलं डोकं बर्याच प्रमाणात कमी होते.
– डोक्यावर कोमट पाणी टाकून आंघोळ करा. यामुळे व्यक्तीचे हायपर ॲनालिसिस कमी होईल आणि त्याला बरं वाटेल.
– तुरीच्या डाळीचे पाणी प्यायल्यानेही चढलेली भांग अथवा थंडाई कमी होते. त्याशिवाय नारळपाणी पिणेही उपयुक्त ठरते. .
होळीच्या सणाच्या दिवशी भांग का पितात ?
भांग आणि होळीचा संबंध हा पारंपरिक आहे. भांगचा सरळ संबंध भगवान शंकरासोबत आहे. होळीसह भांगची परंपरा यामागे शंकरजींची कुठलीही कहाणी नाही.
एका आख्यायिकेनुसार शिव वैराग्यात होते आणि आपला तप करत होते. पार्वतीची अशी इच्छा होती की त्यांनी ही तपस्या सोडावी आणि दाम्पत्य जीवनाचं सुख भोगावं. तेव्हा कामदेवाने फूल बांधून एक बाण शंकरजींच्या दिशेने सोडला जेणेकरुन त्यांची तपस्या भंग व्हावी. या कहाणीनुसार, वैराग्यापासून शंकरजी गृहस्थ जीवनात परतण्याचा उत्सव साजरा करण्यासाठी भांगचं प्रचलन सुरु झालं. पण याच्या तर आणखी अनेक कथा प्रचलित आहेत.
एका आणखी अख्यायिकेनुसार, भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांच्या मैत्रीचं प्रतीक म्हणून त्यांचे भक्त भांगचं सेवन करतात. या अख्यायिकेनुसार भक्त प्रल्हादला मारण्याच्या अनेक प्रयत्न करणाऱ्या हिरण्यकश्यपचा संहार केल्यानंतर भगवान नरसिंहा अत्यंत क्रोधित होते. तेव्हा त्यांना शांत करण्यासाठी अर्धा सिंह आणि अर्धा पक्षी असा शरभ अवतार भगवान शंकरजींनी घेतला.
भांग आणि होळी संबंधी समुद्र मंथनचीही एक कहाणी आहे –
धार्मिक मान्यतेनुसार, समुद्र मंथनादरम्यान जे अमृत निघालं होतं त्यांचा एक थेंब मंदार पर्वतावरही पडली होती. या थेंबातून एक झाड उगवलं. याला औषधी गुणांचा भांगेचं झाड मानलं जातं.
दुधात बादाम, पिस्ता आणि काळी मिरीसोबत थोडी भांग मिसळून तयार करण्यात येणारी थंडाई हे एक अत्यंत लोकप्रिय पेय आहे. तणावमुक्तीसाठी भांगचं सेवन देशात अनेक प्रकारे केलं जातं. विशेषकरुन होळीला मिठाई, खाण्याचे पदार्थ आणि पान यांसारख्या वस्तुंमध्ये भांग मिसळून खाल्ली जाते.