मुंबई : पितृपक्ष संपताच एकामागून एक अनेक मोठे सण येणार आहेत. आधी सत्याचा असत्यावर विजयाचे प्रतिक असलेला दसरा आणि नंतर धनत्रयोदशी, हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा असलेला सण दिवाळी (Diwali 2023) आणि भाऊबीज हे सण येतील. अशा परिस्थितीत या सणांच्या तारखा आणि दिवस जाणून घेण्यासाठी लोकांमध्ये खूप उत्सुकता असते. जेणेकरून ते सणाच्या तारखा डोळ्यासमोर ठेवून पुढील तयारी सुरू करू शकतील. आज आपण या सणांच्या तारखा जाणून घेऊया.
विजय दशमी म्हणजेच दसरा हा अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमी तिथीला साजरा केला जातो. यंदा विजय दशमीचा सण मंगळवार 24 ऑक्टोबर रोजी साजरा होणार आहे.
धनतेरस हा ऐश्वर्य, सुख, आरोग्य आणि समृद्धीचा सण आहे. कार्तिक महिन्यातील त्रयोदशीला हा उत्सव साजरा केला जाईल. कार्तिक महिन्यातील त्रयोदशी तिथी 10 नोव्हेंबर रोजी दुपारी 12.35 ते 11 नोव्हेंबर रोजी दुपारी 01.57 पर्यंत असेल. अशा स्थितीत धनत्रयोदशीचा सण शुक्रवार, 10 नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे. तसे, धनत्रयोदशी सणाची शुभ मुहूर्त संध्याकाळ आहे. संधिप्रकाशात पूजा केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात. धनत्रयोदशीच्या दिवशी, आरोग्याची देवता धन्वंतरीची पूजा केली जाते, ज्यामुळे आपल्याला चांगले आरोग्य मिळण्यास मदत होते.
कार्तिक अमावस्येला दिवाळीचा सण साजरा केला जातो. यावर्षी कार्तिक अमावस्या 12 नोव्हेंबर रोजी दुपारी 02.45 ते 13 नोव्हेंबर रोजी दुपारी 02.56 पर्यंत असेल. अशा परिस्थितीत रविवार, 12 नोव्हेंबर रोजी दिवाळी साजरी होणार आहे. दिवाळीत महालक्ष्मी, सरस्वती, गणेश आणि कुबेर यांची पूजा केली जाते. त्यांच्या उपासनेने आपल्या जीवनात सुख-समृद्धी येते. प्रदोष काळात दिवाळीची पूजा करण्याचा उत्तम काळ असतो. या शुभ मुहूर्तावर उपासना केल्याने इच्छित फळ मिळते.
दिवाळीत पूजेची वेळ
दिवाळीत लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त रविवार 12 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5.39 ते रात्री 8.16 पर्यंत असेल.
हिंदू सणांमध्ये भाऊ बिजेला विशेष दर्जा देण्यात आला आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या ओवाळतात आणि त्याच्या उज्ज्वल भविष्याची आणि दीर्घायुष्याची कामना करतात. यंदा मंगळवार, 14 नोव्हेंबर रोजी भाऊ बीज साजरी होणार आहे. 14 नोव्हेंबर रोजी दुपारी 01.33 ते 03.22 पर्यंत शुभ मुहूर्त असेल.
धनत्रयोदशी- शुक्रवार, 10 नोव्हेंबर
छोटी दिवाळी किंवा नरक चतुर्दशी – शनिवार, 11 नोव्हेंबर
दिवाळी (लक्ष्मी पूजन) – रविवार, 12 नोव्हेंबर
गोवर्धन पूजा आणि भैदूज – मंगळवार, 14 नोव्हेंबर
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)