मुंबई : सध्या सर्वत्र दिवाळीचा सण साजरा केला आहे. दिवाळी म्हंटलं की फटाके, नवीन कपडे, खरेदी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे फराळ. दिवाळीच्या फराळात सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे चकली आहे. चकली हा असा पदार्थ आहे जो प्रत्त्येकालाच येतो असं नाही. कधी ती कडक होते तर कधी तळल्यानंतर थोड्या वेळाने नरम होते. त्यामुळे खमंग खुसखुशीत चकली खायला मिळाली तर प्रत्त्येकच जण त्याची स्तूती करतात. इतकेच काय तर त्याची सिक्रेट रेसीपीसुद्धा विचारतात. तुम्हालासुद्धा दिवाळी निमीत्त्य खमंग आणि खुसखुशीत चकली (Chakli Recipe Marathi) बनवायची आहे का? त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत खास रेसीपी. या पद्धतीने तुम्ही चकली बनवली तर ती खमंग आणि खुसखुशीत तर होईलच शिवाय ती काही दिवस टिकेलसुद्धा. चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया चकलीची रेसीपी.
तांदूळ – 1/2 किलो
चना डाळ – 250 ग्रॅम
मूग डाळ – 150 ग्रॅम
उडदाची डाळ – 150 ग्रॅम
जिरे पावडर – 2 चमचे
धने पावडर – 2 चमचे
लोणी – 2 टेस्पून
लाल मिरची पावडर – 2 चमचे
मीठ – चवीनुसार
तेल
चकली बनवण्याचे यंत्र
महाराष्ट्रीयन स्टाईल चकली बनवण्यासाठी प्रथम मूग डाळ, तांदूळ, उडीद डाळ आणि चणा डाळ वेगवेगळी भिजवावी. त्यांना सुमारे 6 तास भिजवा. यानंतर हे सर्व बाहेर काढून वाळवावे. हे चारही पदार्थ चांगले कोरडे झाल्यावर एका कढईत ठेवा आणि मंद आचेवर सोनेरी होईपर्यंत भाजा. यानंतर त्यांना थंड करण्यासाठी ठेवा. सर्व गोष्टी थंड झाल्यावर मिक्सर ग्राइंडर किंवा कॉब बॅटच्या मदतीने बारीक करा.
आता एका मोठ्या भांड्यात 2 वाट्या मैदा घेऊन त्यात लोणी, जिरेपूड, धनेपूड, तिखट आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. आता या पीठाचे दोन भाग करा. पहिल्या भागात थोडे थोडे पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्या. आता पिठाचे गोळे बनवा आणि प्रत्येक गोळा चकली मशिनमध्ये टाका आणि ताटात किंवा सुती कापडावर पसरून तुम्हाला हव्या त्या आकाराची चकली तयार करा.
पिठाच्या एका भागाचे गोळे पूर्ण झाल्यावर दुसरे पीठ घट्ट मळून घ्या आणि त्यापासून वर सांगितल्याप्रमाणे चकल्या तयार करा. (लक्षात ठेवा की पीठ दोन भागांत मळून घ्यावे कारण ते कठिण असल्यामुळे जास्त वेळ ठेवल्यास चकली बनवण्यास अडचण येते.) आता गॅसवर कढई ठेवा आणि त्यात तेल घालून गरम करा. तेल चांगले तापले की पॅनच्या क्षमतेनुसार चकल्या घालून तळून घ्या. अशा प्रकारे सर्व चकल्या तळून घ्या. आता या चकल्या थंड होण्यासाठी ठेवा. आता तुमची चकली दिवाळीसाठी तयार आहे. जास्त काळ टिकण्यासाठी हवाबंद डब्यात ठेवा.