मुंबई | 13 जानेवारी 2024 : मकर संक्रांतीचा सण यावर्षी 15 जानेवारी रोजी साजरा केला जाणार आहे. नवीन वर्षाचा हिंदू धर्मातील सर्वात पवित्र सणांपैकी असा एक हा पहिला सण. मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान आणि दान याला विशेष महत्त्व आहे. मात्र, या दिवशी काही कामे वर्ज्य आहेत. अनेक उपक्रम निषिद्ध असतात. असे केल्याने तुमच्या घरात गरिबी येऊ शकते. शिवाय तुमचे जीवनही दुखाने भरेल. तर काही उपाय करून घरातील गरिबी तुम्ही दुर करू शकता.
मकर संक्रांत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने साजरी केली जाते. बिहार आणि झारखंड सारख्या राज्यांमध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी लोक दही आणि चुरा खाऊन नवीन पिकाची धान्ये खातात. मकर संक्रांतीचा सण यंदा 15 जानेवारीला साजरा केला जाणार आहे. कारण 15 तारखेला सूर्यास्त होतो. मकर संक्रांतीच्या वेळी गंगेत स्नान करावे, यामुळे मोक्ष प्राप्त होण्यास मदत होते. यासोबतच मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ, बांगड्या, दही, गूळ आदी पदार्थ खाण्याची परंपरा आहे.
मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही गरजू व्यक्तीला धान्य आणि कपडे दान करा. यामुळे भगवान सूर्याची वर्षभर विशेष कृपा होईल. मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळ केल्यानंतर सूर्याला जल अर्पण करा यामुळे वर्षभर आरोग्य चांगले राहिल. या दिवशी काळे तीळ, पांढरे तीळ, गूळ आणि सुहाग साहित्य दान केल्याने अशुभ दूर होते. गरिबी दूर होते.
मकरसंक्रांतीच्या दिवशी गाईच्या तुपात पांढरे तीळ मिसळून देवी लक्ष्मी किंवा श्री सूक्ताचे हवन केल्यास देवी लक्ष्मी घरात वास करते. तीळ हे दारिद्र्य नष्ट करणारे असल्याचे म्हटले आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी कडाक्याची थंडी असते अशा परिस्थितीत तीळ आणि गुळाचे सेवन केल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो.
मकर संक्रांतीच्या दिवशी नवीन कामाची सुरुवात करणे शुभ मानले जाते. नवीन गुंतवणूक, नवीन व्यवसाय, नवीन नोकरी सुरू केल्याने समृद्धी येते, नशीब सूर्यासारखे चमकते. तसेच, गाईला हिरवा चारा घालणे यामुळे सौभाग्य वाढते असे मानले जाते.
मकर संक्रांतीच्या दिवशी अजिबात करू नयेत अशा काही गोष्टी आहेत. त्याचा नकारात्मक परिणाम तुमच्या आयुष्यावर होतो.
मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही मांस किंवा तामसिक अन्न खाऊ नका. याचा तुमच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
मकर संक्रांतीच्या दिवशी गरिबांना रिकाम्या हाताने घरी पाठवू नका. नाही तर तुमच्या घरी गरिबी येऊ शकते.
मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाला तांब्याच्या भांड्याशिवाय इतर कोणत्याही पात्रातून पाणी अर्पण करू नका.
मकर संक्रांतीच्या दिवशी घरात कोणाला शिवीगाळ करू नका. यामुळे घरातील नकारात्मक प्रभाव वाढतो आणि जीवनात दु:ख येतात.