नवी दिल्ली : होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. लोक वर्षभर या सणाची वाट पाहत असतात. या सणानिनित्त सगळे एकमेकांना भेटतात. शुभेच्छा देतात, मनमुराद रंग खेळत मिठाईचा आस्वाद घेतात. यामुळे बंधुभाव वाढतो. पण होळी खेळताना आपण कोणते रंग वापरतो, याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. जर तुम्ही एकमेकांना रासायनिक रंग (chemical colors) लावण्याचा विचार करत असाल तर असे अजिबात करू नका. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, होळीच्या रंगांमध्ये अनेक घातक रसायने (harmful chemicals) देखील असतात, जी आरोग्यासाठी तसेच आपल्या डोळ्यांसाठी (eye care) अतिशय हानिकारक असतात. हे रासायनिक रंग डोळ्यात गेले तर खूप त्रास होऊ शकतो.
डॉक्टरांच्यां सांगण्यानुसार रासायनिक रंग डोळ्यात राहिल्यास ॲलर्जी, मायबोमायटिस होऊ शकते. पापण्यांच्या ग्रंथींचा संसर्ग आणि कॉर्नियल अल्सर यासारख्या समस्याही उद्भवू शकतात, ज्यामुळे अंधत्व येऊ शकते. डोळ्यांमध्ये रंग जास्त गेल्यास काचबिंदू आणि डोळे कोरडे होणे असा त्रास होण्याचा धोका असतो. अशा परिस्थितीत, होळी खेळताना रासायनिक रंग वापरणे बिलकूल टाळले पाहिजे. त्याऐवजी गुलाल किंवा चंदन वापरणे चांगले ठरते. रासायनिक रंगांमुळे डोळ्यांसोबतच त्वचेचेही खूप नुकसान होऊ शकते. अशा वेळी होळी खेळण्यासाठी रंग काळजीपूर्वक निवडा.
काय आहे डॉक्टरांचा सल्ला ?
ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ स्पष्ट करतात की होळीच्या काही रंगांमध्ये सिलिका आणि शिसे असते. ही घातक रसायने डोळ्यांसाठी अतिशय हानिकारक असतात. यामुळे डोळ्यांना इजा होण्याचा धोका असतो. या रसायनांमुळे डोळ्याच्या बाहुलीलाही इजा होऊ शकते. अशा परिस्थितीत होळी खेळताना जपून राहणे, रंग डोळ्यांमध्ये जाणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे.
या गोष्टींची घ्या विशेष काळजी
डॉक्टर सांगतात की होळी खेळताना डोळ्यात रंग गेला तर 15-30 मिनिटे सतत स्वच्छ थंड पाण्याने डोळे धुवावेत. डोळ्यात रंग गेल्यास डोळे चोळू नका, ते पाण्यानेच धुवा. यानंतर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. डोळ्यात जळजळ होत असेल आणि डोळ्यातून पाणी येत असल्यास, त्याकडे बिलकूल दुर्लक्ष करू नका. डोळ्यांची काळजी घेतली नाही तर परिस्थिती बिघडू शकते. डोळ्यांभोवतीचा रंग काढण्यासाठी अल्कोहोल किंवा टोनर वापरू नका हे देखील लक्षात ठेवा.
रंग खेळायला जाण्यापूर्वी तुमच्या चेहऱ्याला तसेच डोळ्याभोवती चांगले मॉयश्चरायझर वापरा जेणेकरून तुमच्या डोळ्याभोवती कोणताही रंग जमा होणार नाही.
डोळे स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्ही गुलाबपाणी देखील वापरू शकता. गुलाबपाणी डोळ्यातील रंगद्रव्याचे डाग आणि धूळ काढण्यास मदत करते. गुलाबपाण्यामध्ये अँटिसेप्टिक गुणधर्म देखील असतात. तसेच, रसायनांमुळे प्रभावित झाल्याने डोळ्याची जळजळ कमी होत असेल तर तेही कमी करण्यास मदत करते.
रंग खेळून झाल्यावर तुमचे डोळे थंड पाण्याने स्वच्छ धुवावेत. त्यानंतर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आयड्रॉप्सचा वापर करा. बाजारात विविध आयड्रॉप्स उपलब्ध आहेत, डोळ्यांची कोणतीही ॲलर्जी टाळण्यासाठी ते वापरण्याची शिफारस केली जाते. पण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही ड्रॉप्स वापरू नका अन्यथा नुकसान होऊ शकते. आयड्रॉप्स वापरल्याने तुमच्या डोळ्यांना खाज सुटणे आणि तसेच डोळे दुखणे यापासून आराम मिळेल. होळी खेळण्यापूर्वी आणि नंतर थोडे थेंब डोळ्यात घालावेत.