मुंबई : 15 ऑक्टोबर 2023 पासून शारदीय नवरात्रीला (Navratri 2023) सुरुवात होत आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते आणि 9 दिवस अखंड ज्योती पेटवली जाते. नवरात्रीच्या पवित्र 9 दिवसांत अखंड ज्योती प्रज्वलित करण्याचे अनेक फायदे आहेत. या 9 दिवसात देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. यंदा 15 ऑक्टोबरपासून सुरू होणारी शारदीय नवरात्री 23 ऑक्टोबरला संपणार असून 24 ऑक्टोबरला दसरा साजरा होणार आहे. त्याच्या दूसऱ्या दिवशी दुर्गा मूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. या वर्षी नवरात्रीच्या काळात दुर्गा देवीचे हत्तीवर बसून आगमन होत आहे, जे अत्यंत शुभ आहे. चला जाणून घेऊया नवरात्रीत देवीसमोर अखंड ज्योती का लावली जाते.
नवरात्रीमध्ये अखंड ज्योती प्रज्वलित करण्याचे विशेष महत्त्व आहे. अखंड ज्योती म्हणजे दिवा सतत तेवत ठेवणे आणि विझू न देणे. नवरात्रीमध्ये 9 दिवस सतत 24 तास देवीसमोर दिवा लावला जातो. असे मानले जाते की अखंड ज्योती प्रज्वलित केल्याने घरात समृद्धी येते आणि देवी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो. देवी प्रसन्न होऊन सर्व मनोकामना पूर्ण करते. दिवा विझू नये म्हणून त्यात तेल किंवा तूप संपणार नाही याची काळजी घ्यावी लागते. तसेच, वाऱ्याने दिवा विझू नये, यासाठी त्याभोवती काचेचे कवच ठेवले जाते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)