Ganesh Visarjan Date and Time 2024 : अनंत चतुर्दशीला गणपत्ती बाप्पाला आपण पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आवाहन करीत विसर्जन करणार आहोत. या वेळी आपण विसर्जनाच्या मिरवणूकी वाजत गाजत काढत असतो. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्ष चतुर्थी तिथीला गणेश उत्सवाची सुरुवात गणेश चतुर्थीला आपण करीत असतो. या उत्सव भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्दशी पर्यंत साजरा केला जातो. या दरम्यान, दहा दिवस आपण बाप्पाच्या आरत्यांमध्ये अगदी रममाण झालेलो होतो. परंतू अखेर बाप्पाला पुढच्या वर्षी येण्याचे आवाहन करीत त्याला निरोप देण्याची घडी आली आहे. येत्या 17 सप्टेंबर रोजी आपण जड अंत: करणाने आपल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन करणार आहोत. त्याचा विधी आणि शुभ मुहूर्त काय आहेत ते पाहूयात…
वैदीक पंचांगानूसार अनंत चतुर्दशी तिथीची सुरुवात 16 सप्टेंबर 2024 रोजी 3.10 वाजता सुरु होणार आहे. आणि चतुर्दशीचे समाप्ती 17 सप्टेंबर 2024 रोजी 11.44 वाजता होणार आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 6.20 वाजल्यापासून 11.44 वाजेपर्यंत असणार आहे.
हिंदू वैदिक पंचांगानुसार बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जनाचा शुभ मुहूर्त सकाळी 9.23 वाजल्यापासून सायंकाळी 9.28 वाजेपर्यंत असणार आहे.असे म्हटले जाते की शुभ मुहूर्तावर बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन केल्याने शुभ फलाचा लाभ होतो.
गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी लाकडाचा पाठ तयार करावा. त्यावर स्वास्तिक चिन्ह तयार करावे.त्यावर गंगाजल शिंपडावे. त्यावर नंतर पिवळ्या रंगाचा कपडा अंथरावा.त्यावर नंतर बाप्पाच्या मूर्तीला नवे वस्र परिधान करावेत. बाप्पाला गंध लावावा. आसनावर अक्षता टाकाव्या त्यानंतर गणपतीच्या मूर्तीवर फूल,फळ आणि मोदक आदीचा नैवद्य बाप्पाला दाखवावा. बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करण्याआधी बाप्पाची मनोभावे पूजा करावी.त्यानंतर बाप्पाला पुढच्या वर्षी पुन्हा लवकर येण्याची साद घालावी.त्यानंतर कुटुंबासह बाप्पाची आरती करावी.त्यानंतर बाप्पाचे विधिपूर्वक विसर्जन करावे. बाप्पाला काही चुकले असले तर माफी मागावी. आणि पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आवाहन बाप्पाला करीत प्रार्थना करावी.