तंदुरूस्त आणि निरोगी लोकांनी रक्तदान करणे हे आवश्यक आहे. यामुळे आरोग्याला हानी पोहोचत नाही किंवा कोणत्याही प्रकारचा अशक्तपणा जाणवत नाही, उलट रक्तदान केल्याने फायदाच होतो. रक्दान करून तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीचे प्राण वाचवू शकता. पण असे काही लोक असतात, ज्यांना इच्छा असूनही ते रक्तदान करू शकत नाहीत. त्यामागचं कारण काय ते जाणून घेऊया.
रक्तदान कोणी करू नये ?
याच कारणासाठी रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. रक्त हा आपल्या शरीरातील सर्वात आवश्यक घटक आहे ज्याद्वारे शरीराच्या सर्व अवयवांना अनेक पोषक तत्वं मिळतात. तसेच ऑक्सिजन शरीराच्या प्रत्येक अवयवापर्यंत पोहोचतो. जर शरीरात रक्ताची कमतरता असेल तर अनेक आजार होऊ शकतात. म्हणूनच निरोगी लोक वेळोवेळी रक्तदान करत राहतात. पण असे काही लोक आहेत जे रक्तदान करू शकत नाहीत. जे लोक शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी आहेत आणि त्यांना कोणताही आजार नाही ते रक्तदान करू शकतात. रक्तदान करण्यासाठी व्यक्तीचे वय किमान 18 वर्षे असणे आवश्यक आहे.
हे आजार असल्यास रक्तदान करू नये
एका रिपोर्टनुसार, ज्या लोकांना हेपेटायटिस B, हेपेटायटिस C, एचआयव्ही, हाय ब्लड प्रेशर किंवा रक्ताशी संबंधित गंभीर आजार असतात, त्यांनी रक्तदान करू नये. कॅन्सर, ऑटोइम्युन डिसीज आणि हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या रुग्णाने तर रक्तदान बिलकूल करू नये. तसेच ज्यांना ब्लड इन्फेक्शन आहे त्यांनीही रक्तदान करू नये. कारण जेव्हा संक्रमित रक्त दुसऱ्या व्यक्तीला दिले जाते तेव्हा त्यांना इतर गंभीर आजार होण्याची भीती देखील असू शकते. कोणत्याही आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला रक्तदान करण्याचा सल्ला दिला जात नाही.
रक्तदान करण्यापूर्वी काही टेस्ट्स जरूर केल्या पाहिजेत. कारण डोनरच्या ( रक्तदान करणारी व्यक्ती) वैद्यकीय इतिहासाबद्दल ( मेडिकल हिस्टरी) पुरेशी माहिती असणं गरजेचं असतं. एखाद्या व्यक्तीला अनुवांशिक किंवा गंभीर आजार असल्यास अशा व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला रक्तदान करणे टाळावे. बरेच लोक हृदयविकार, संसर्ग आणि शस्त्रक्रियेतून बरे होतात, परंतु त्यांचे रक्त घेणे नंतर धोकादायक ठरू शकते. रुग्णाची सुरक्षितता लक्षात घेऊन वैद्यकीय इतिहास लक्षात ठेवावा. जर एखादी व्यक्ती गंभीर आजाराने ग्रस्त असेल तर त्याला रक्तदान न करण्याचा सल्ला दिला जातो.
जे लोक तंदुरूस्त आणि निरोगी आहेत, गंभीर आजाराने ग्रासलेले नाहीत आणि ज्याचं वय 50 पेक्षा कमी आहे, जे रक्तदान नक्कीच करू शकतात. तसेच, रक्त पातळ करण्याचे औषध घेणारे, कावीळ ग्रस्त आणि विशेषतः हिपेटायटीस बी किंवा सी किंवा ॲनिमिया असलेल्या लोकांनी रक्तदान करणे टाळावे.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)