Health News : प्रत्येकाला बाहेरचे वेगवेगळे पदार्थ खायला आवडतातच. सध्याच्या काळात तर लोक मोठ्या प्रमाणात फास्ट फूडवर ताव मारताना दिसतात. पण तुम्हाला माहितीये का की वयाच्या 30 शी नंतर काही असे पदार्थ आहेत जे खाणं टाळावं. कारण वयाच्या तिशीत शरीरात बदल होत असतात, त्या बदलांमुळे शरीराला काही पदार्थ हानीकारक असतात. नेमके कोणते पदार्थ आहेत जे खाणं टाळलं पाहिजे.
वयाच्या 30 वर्षानंतर तुमच्या शरीरात बरेच बदल होऊ लागतात. त्यामुळे या वयात तुम्ही तुमच्या आहारात आरोग्याच्या दृष्टीने कोणत्या गोष्टी खात आहात हे याकडे लक्ष द्यायला हवं. कारण तुमच्या शरीरावर फक्त कॅलरीजचाच परिणाम होत नाही तर साखर, मीठ आणि केमिकल्स यांसारख्या इतर गोष्टींचाही परिणाम होतो. तर अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या टाळून तुम्ही निरोगी राहू शकता.
असे म्हटले जाते की साखर ही वृद्धत्वाची प्रक्रिया गतिमान करते. तसेच त्वचा तरुण ठेवण्यासाठी साखर चांगली मानली जात नाही. तसेच की फळांच्या फ्लेवर्ड दह्यात साखरेचे प्रमाण जास्त असते. म्हणूनच फ्लेवर्ड दही मर्यादित प्रमाणातच खा.
पॅकबंद डब्यात असलेल्या सूपमध्ये मीठ जास्त प्रमाणात आढळते. त्यामुळे रक्तातील साखर वाढण्याचा धोका आहे. तर काही पॅकबंद डब्यातील सूपमध्ये बिस्फेनॉल ए देखील असते. हे एक रसायन आहे ज्यामुळे कर्करोग, वंध्यत्व आणि वजन वाढणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे बाहेरचे सूप पिणं टाळा.
ब्रेकफास्ट पेस्ट्री आपल्या आरोग्यासाठी धोकादायक असू शकते. उच्च कॅलरी असलेल्या ब्रेकफास्ट पेस्ट्री पासून वजन वाढण्याची शक्यता आहे. तसंच वजन वाढण्यासोबतच हे खाल्ल्याने शरीराला इतर आरोग्य समस्याही उद्भवू शकतात.
प्रत्येकाला आपल्या आहारात प्रोटीनची गरज असतेच. मात्र, या प्रोटीन बारमध्ये इतकी रसायने आणि साखर आढळते, ज्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे प्रोटीन बारच समावेश आहारात जास्त प्रमाणात करू नका.