मुंबई : सेक्स पॉवर वाढण्यासाठी वियाग्राच्या गोळ्या खाल्ल्या जात असतात. परंतू या गोळ्यामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याचेही उघडकीस होत असते. आता नागपूरमध्ये 41 वर्षीय व्यक्तीचा त्याने दारूच्या नशेत वियाग्राच्या दोन गोळ्या खाल्ल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. जर्नल ऑफ फॉरेन्सिक एण्ड लिगल मेडीसिनमध्ये प्रकाशित एका अभ्यासाआधारे news.au.com ने हे वृत्त दिले आहे. यामुळे वियाग्रा गोळ्या खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट झाले आहे.
एक व्यक्ती त्याच्या मैत्रिणीसोबत एका हॉटेलमध्ये गेला होता. तेथे त्याने दारू सोबत सिल्डेनाफिलच्या 50 मिलिग्रामच्या दोन गोळ्या खाल्ल्या होत्या. या गोळ्या वियाग्रा ब्रॅंडने विकल्या जात असतात. या व्यक्तीचा कोणताही वैद्यकीय आजाराचा इतिहास नव्हता. त्याने केवळ मद्य सेवन केले होते. सकाळ झाली तेव्हा त्याला बैचेन वाटू लागले. त्याला उलट्याही होऊ लागल्या होत्या. त्यामुळे त्याला त्याच्या मैत्रिणीने मेडीकल हेल्प घेण्याचाही सल्ला दिला. परंतू त्याने त्याच्या मैत्रिणीचा सल्ला ऐकला नाही. परंतू त्याची तब्येत जेव्हा आणखी खालावली तेव्हा त्याला रूग्णालयात नेण्यात आले. परंतू तेथे त्याला मृत घोषीत करण्यात आले. अभ्यासानूसार त्याचा मृत्यू सेरेब्रोवास्कुलर हॅमरेज झाल्याने झाल्याचे म्हटले जात आहे. मेंदूला जेव्हा ऑक्सिजन मिळत नाही तेव्हा ही स्थिती निर्माण होते.
पोस्टमार्टेममध्ये काय आढळले
पोस्टमार्टेममध्ये डॉक्टरांना 300 ग्रॅम रक्त साखळलेले आढळले. दारू आणि औषधाच्या मिश्रण आणि त्यातच उद्भवलेला हाय ब्लड प्रैशरचा त्रास यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. हे दुर्लभ प्रकरण असल्याने यातून इतरांनी धडा घ्यावा यासाठी त्याला प्रकाशित केल्याचे म्हटले आहे. कोणत्याही वैद्यकीय सल्ल्याशिवाय इरेक्टाईल डिसफंक्शनचे औषध घेण्याचा धोक्यासंदर्भात जागरूकता पसरविण्यासाठी हा अभ्यास प्रकाशित केला असल्याचे म्हटले आहे.