आता कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराचे जर झटपट निदान झाले तर उपचार लवकर सुरु करता येतात आणि रुग्णाचे प्राण वाचविणे शक्य होते. आयआयटी कानपूर येथील प्राध्यापकांनी कॅन्सरचे झटपट निदान करणाऱ्या एका प्रकारच्या डीव्हाईस शोध लावला आहे. त्याची अचुकता 90 टक्क्यांपर्यंत आहे. आणि केवळ 60 सेंकदात हे उपकरण कॅन्सरचे निदान करु शकते. या उपकरणाने तोंडाचा माऊथ कॅन्सर लागलीच ओळखणे सोपे झाले आहे. हे उपकरण तोंडाच्या आतील भागाचा फोटो काढले आणि त्याचे वर्गीकरण करुन लागलीच रिपोर्ट देईल. काय झाले आहे नेमके संशोधन पाहुयात ?
या उपकरणाने तोंडाच्या कॅन्सरचा छडा लागतोत शिवाय तो कोणत्या टप्प्याचा कॅन्सर आहे हे देखील ओळखता येणार आहे. या डीव्हाईसला केमिकल इंजिनिअर्स डिपार्टमेंटचे प्रा.जयंत कुमार यांच्या मदतीने स्कॅन जिनी नावाच्या कंपनीने तयार केले आहे.यावर्षी डिसेंबरमध्ये हे उपकरण बाजारात उपलब्ध होऊ शकते.या उपकरणाची काय आहे वैशिष्ट्ये आणि इतर माहिती पाहूयात…
या उपकरणाला प्रा. जयंत कुमार सिंह यांच्या टीमने सहा वर्षांच्या संशोधनानंतर विकसित केले आहे. हे पोर्टेबल डिव्हाईस असून ते ब्रशच्या आकाराचे असते. हे एक पोर्टबल डीव्हाईस आहे. ज्याला एका बॅगात ठेवून कुठेही घेऊन जाऊ शकता. कानपूर येथे कॅम्प लावून तीन हजार लोकांची चाचणी करण्यात आली.या उपकरणामुळे 22 वर्षांच्या तरुणापर्यंत चाचणी करुन कॅन्सरचा छडा लागू शकतो. या पाहणीत फॅक्टरीत काम करणारे मजूर तसेच खाजगी काम करणारे देखील सामील झाले होते.
टुथब्रशच्या आकारच्या उपकरणात हाय क्लालिटी कॅमेरा असून एलईडी लावले आहेत. याला स्मार्टफोन किंवा टॅबलेटला कनेक्ट करता येते. कॅमेरा तोंडाच्या आतील फोटो घेऊन डिटेल्स रिपोर्ट मोबाईलवर पाठवतो. हे उपकरण पॉवर बॅकअपसह ट्रॅकींगसाठी हेल्थ हिस्ट्री जमा करते. याचे निदान 90 टक्क्यांपर्यंत अचूक असते. तोंडाची तपासणी सुरु असताना कसलाही त्रास होत नाही.
माऊथ कॅन्सरचे निदान करणाऱ्या या उपकरणाची किंमत दीड लाखापासून ते दोन लाखापर्यंत असणार आहे. यात लावलेली उपकरणे परदेशातून आयात केली आहेत. त्यामुळे त्याची किंमत जादा आहे. एक उपकरण पाच लाख लोकांची तपासणी करु शकते. एका दिवसात तीनशे जणांची तपासणी होऊ शकते. या उपकरणाने वैद्यकीय क्षेत्रात मोठी क्रांती येऊ शकते.