सकाळी-सकाळी तो मॅरेथॉनमध्ये 3 तास धावला, पण घरी जाताना वाटेतच ओढावला मृत्यू !

| Updated on: Apr 27, 2023 | 2:04 PM

मृत्यू हे जगाचे एक सत्य आहे, ज्याचा सामना प्रत्येकाला एक ना एक दिवस भोगावाच लागतो. तो कधी आणि कोणत्या रुपात कोणाच्या समोर येईल हे कोणीच सांगू शकत नाही.

सकाळी-सकाळी तो मॅरेथॉनमध्ये 3 तास धावला, पण घरी जाताना वाटेतच ओढावला मृत्यू !
Image Credit source: freepik
Follow us on

लंडन : मृत्यू (death) कधी येईल हे कोणी सांगू शकत नाही. हे इतकं प्रखर सत्य आहे, की तो कोणत्याही प्रकारची नोटीस न देता लोकांना घेऊन जाते. रात्रीच्या वेळी तुम्ही एखाद्या व्यक्तीला सुरक्षित आणि तंदुरुस्त पाहता आणि सकाळी अचानक तुम्हाला कळते की तो झोपेतच मरण पावला. सोशल मीडियावर (social media) लोक अजूनही 45 वर्षीय स्टीव्ह शँक्स यांना श्रद्धांजली वाहतात. स्टीव्हने आयुष्यात अनेक मॅरेथॉन (marathon) पूर्ण केल्या होत्या. मात्र गेल्या रविवारी मॅरेथॉन पूर्ण करून घरी जात असताना त्यांचा अचानक मृत्यू झाला.

लंडनमध्ये राहणाऱ्या स्टीव्ह शँक्सला मॅरेथॉनमध्ये धावण्याचा खूप अनुभव होता. पण या मॅरेथॉनमुळे त्याला आपला जीव गमवावा लागेल असे कधीच वाटले नव्हते. गेल्या रविवारी स्टीव्हने लंडन मॅरेथॉनमध्ये भाग घेतला. त्यांनी तीन तासांत शर्यत पूर्ण केली. यानंतर घरी परतत असताना त्यांना जीव गमवावा लागला. गाडीत बसूनच त्यांचा मृत्यू झाला. मॅरेथॉनच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. आतापर्यंत मृत्यूचे खरे कारण समोर आलेले नाही.

मॅरेथॉन पूर्ण करून घरी जात असतानाच मृत्यूने गाठलं

मिळालेल्या माहितीनुसार, 45 वर्षीय स्टीव्हने तीन तासात मॅरेथॉन पूर्ण केली होती. यानंतर ते घराकडे रवाना झाला, पण घरी पोहोचूच शकले नाहीत. वाटेतच त्यांचा अचानक मृत्यू झाला. या घटनेनंतर लंडन मॅरेथॉन थ्री यांनी स्टीव्हची पत्नी आणि कुटुंबाप्रती सहानुभूती व्यक्त केली. स्टीव्हनी अनेक मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता. पण स्टीव्हला जे (धावण्याचं) काम खूप आवडतं तेच त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरेल, असं कधीच कुणाला वाटलं नव्हतं.

स्टीव्ह धावून होते आनंदी

स्टीव्हला ओळखणाऱ्या लोकांना या घटनेने खूप दु:ख झाले आहे. अनेकांनी स्टीव्हचे मनाने खूप चांगली असलेली व्यक्ती वर्णन केले. त्याच्या एका जवळच्या मित्राच्या मते, स्टीव्हला मॅरेथॉन धावण्यात खूप आनंद मिळत असे. धावण्याव्यतिरिक्त, तो एक संगीतकार होता आणि क्विझबद्दल खूप जाणकार होता. त्याच्या जाण्याने त्याचे अनेक चाहते निराश झाले आहेत. त्याची पत्नी जेसनेही सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट केली आहे. तिने लिहिले की ती अजूनही हे सत्य स्वीकारण्यास असमर्थ आहे. आता अंत्यसंस्काराच्या तयारीनंतर सर्वजण स्टीव्हला निरोप देण्याची तयारी करत आहेत.