जास्त मोबाईल पाहिल्याने महिलेची दृष्टी गेली, तुम्हीही झोपून मोबाईल पहाता काय ?

| Updated on: Feb 10, 2023 | 9:29 AM

मुलासाठी स्वत: ची नोकरी सोडल्यानंतर तिला या समस्या सुरू झाल्या. तिला आता भरपूर मोकळा वेळ मिळाल्याने तिला लाईट बंद करून रात्रीचा मोबाईल पहायची सवय लागली.

जास्त मोबाईल पाहिल्याने महिलेची दृष्टी गेली, तुम्हीही झोपून मोबाईल पहाता काय ?
mobile-PhoneInBed
Image Credit source: socialmedia
Follow us on

दिल्ली : मोबाईल शिवाय सध्या आपले पानही हलत नाही. मोबाईल ( mobile ) आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. आपण आता वेळ पाहण्यासाठीही घड्याळा ऐवजी मोबाईलच पहात असतो, इतके आपण मोबाईलच्या आहारी गेलो आहोत. आता मोबाईलचे प्रमाणाच्या बाहेर असलेले व्यसन नुकसानकारक ठरू शकते. असाच एक प्रकार घडला आहे. त्याचे झाले काय की मोबाईल जास्त पाहील्याने एका महिलेला तिची दृष्टी ( eyesight ) गमवावी लागल्याची घटना घडली आहे. त्यामुळे तुम्हालाही जर जास्त वेळ मोबाईलच्या स्क्रीनवर ( screen ) डोळे चिकटून राहायची सवय असेल तर ही बाचमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.

मोबाईल आल्यानंतर लहान मुलांचे मैदानात जाऊन खेळण्याचे प्रमाण घटले आहे. मुले पहिल्यासारखी मैदानाचे खेळ खेळत नाहीत, सतत मोबाईलचे गेम्स खेळत बसलेली दिसत असतात. मोबाईलने आपल्या जीवनाला खूप सोपे केले असले तरी त्याचे धोकेही समोर येत आहेत, आता हेच पाहा ना हैदराबाद येथील एका महिलेचे डोळे मोबाईल पाहिल्याने खराब झाल्याचे उघडकीस आले आहे. 30 वर्षीय या महिलेला त्यामुळे खूपच समस्यांना सामोरे जावे लागले. या महिलेची डोळे अधू झाल्याने तिला सलग 18 महिने उपचार घ्यावे लागले, त्या महिलेवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सोशल मिडीयावर शेअर केलेली माहिती तुमची झोप उडवू शकते.

दीड वर्षे डोळ्यांची दृष्टी बंद होती

हैदराबादच्या अपोलो रूग्णालयाचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. सुधीर कुमार यांनी म्हटले आहे की, तीस वर्षीय मंजू यांच दृष्टी अधू झाली होती. ही समस्या त्यांनी दीड वर्षे होती. मंजूला तिच्या डोळ्यांसमोर फ्लोटर्स ( ताऱ्यांसारखे चमकते ) लाईट्स,  चमकते फ्लॅश, डार्क झीग झॅग लाईन्स दिसत होत्या. कधी कधी तर कोणत्याही वस्तूवर लक्ष केंद्रीत करता येत नव्हते. कधी कधी तर काही सेंकद त्यांना काहीच दिसत नव्हते. असे तिला तेव्हा व्हायचे जेव्हा तिला रात्री वॉश रूमला जायचे असायचे तेव्हा तिला अशा प्रकारे त्रास व्हायचा. जेव्हा तिने डोळ्यांच्या डॉक्टरांना दाखविले तर तिचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आले होते. परंतू त्रास तर सुरूच होता. मग तिला न्यूरोलॉजिस्ट गाठला.

लाईट बंद करून रात्रीचा मोबाईल पहायची सवय

डॉक्टरांनी तिची हिस्ट्रूी चेक केली तर तिने स्पेशली एबल्ड मुलासाठी स्वत: ची नोकरी सोडल्यानंतर तिला या समस्या सुरू झाल्याचे उघडकीस आले. तिला आता भरपूर मोकळा वेळ मिळाल्याने तिला लाईट बंद करून रात्रीचा मोबाईल पहायची सवय लागली. अनेक तास स्क्रीन स्क्रोल करीत रहायची तिला सवयच लागली. ती फोनचा वापर मनोरंजनासाठी करायची. यात कधी कधी सलग दोन तास रात्रीचे लाईट बंद करून मोबाईल पहाण्याची तिला सवय लागली. डॉक्टरांनी सांगितले की तिला स्मार्ट फोन व्हीजन सिंड्रोमची बाधा झाल्याचे उघडकीस आले. कंप्यूटर, स्मार्टफोन किंवा टॅबलेट खूप वेळ पाहिल्यानंतर डोळ्यांशी निगडीत अनेक आजार होऊ शकतात असे डॉक्टरांनी म्हटले आहे.

मोबाईलपासून दूर होताच बरी झाली मंजू

डॉ.सूधीर यांनी सांगितले की, मंजूला कोणतेही औषध न देता केवळ फोनचा वापर कमी करण्याचा सल्ला दिला. केवळ अत्यंत गरज असेल तेव्हाच तिला मोबाईल पहावा असे बजावले. एक महिन्याच्या या प्रयोगानंतर मंजू बरी झाली. 18 महिन्यांपासून त्यांची कमी झालेली दृष्टी पुन्हा पूर्ववत झाली. आता तिची आयसाईट पूर्ववत झाली आहे. आता तिच्या डोळ्यापुढे कोणतीही चमकता उजेड किंवा इतर विभ्रम दिसत नाहीत. रात्रीच्यावेळी वॉश रुमला जाताना तिच्या डोळ्यांसमोर येणारी अंधारी दूर झाली.

डॉक्टरांनी दिला सल्ला

डॉक्टरांनी सल्ला दिला आहे की कोणताही डीजिटल डिव्हाईस जास्त वेळ वापरू नका, त्यामुळे डोळ्यांच्यावर गंभीर परीणाम होऊ शकतो. दर २० – २० मिनिटांचा ब्रेक घेणे गरजेचे आहे. स्क्रीनवर काम करताना स्क्रीन पासून डोळे दूर करायला हवे, स्क्रीनवर काम करताना सलग जादा वेळ न बसता अधूनमधून ब्रेक घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.