मुंबई : बॉलिवूडचा सिंघम, अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan) याने आणखी एक नवी प्रॉपर्टी विकत (bought property) घेतली आहे. अजयने अंधेरी पश्चिम येथे त्याच्या ऑफीस स्पेससाठी एक मोठी इन्व्हेस्टमेंट केली आहे. रिपोर्ट्स नुसार, अभिनेत्याने ऑफीससाठी 13,293 स्क्वेअर फूट जागा विकत घेतली असून त्याची किंमत 45 कोटी रुपये असल्याचे समजते. मात्र याबद्दल अद्याप अजय देवगण किंवा त्याच्या जवळच्यांकडून कोणीतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार, 13,293 स्क्वेअर फूटच्या या जागेच्या पहिल्या युनिटमध्ये 8,405 स्क्वेअर फूटचा बिल्ड अप एरिया आहे. एका सिग्नेचर बिल्डींगच्या 16 व्या मजल्यावर अभिनेत्याच्या ऑफीसची ही जाग आहे. या युनिटची किंमत 30.35 कोटी रुपये असून त्याच्या स्टँप ड्युटीसाठी अजयने 1.82 कोटी रुपये भरले आहेत. तर दुसरे युनिट हे 17 व्या मजल्यावर असून त्याचा एरिया 4,893 स्क्वेअर फूट इतका आहे.
या दुसऱ्या युनिटसाठी अजयने 14.74 कोटी रुपयांची स्पेस विकत घेतली असून 88.44 लाख रुपये स्टँप ड्युटी भरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 19 एप्रिल रोजीच अजय देवगणच्या नावे ही प्रॉपर्टी रजिस्टर करण्यात आली होती.
काजोलनेही खरेदी केली होती प्रॉपर्टी
यापूर्वी अजय देवगणची पत्नी आणि अभिनेत्री काजोल हिनेही मुंबईत 16.5 कोटी रुपयांचे घर विकत घेतले होते. त्याच्या पाच दिवसांनंर अजयने नवीन प्रॉपर्टी त्याच्या नावे घेतली होती. या दोघांकडेही कोट्यावधी रुपयांची संपत्ती आहे.
कामाबद्दल बोलायचे झाले तर अजय नुकताच ‘भोला’ या चित्रपटात दिसला होता. यानंतर तो रोहित शेट्टीच्या ‘सिंघम ३ ‘ मध्ये दिसणार आहेय या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पडूकोण ही देखील लेडी सिंघमच्या रुपात झळकणार असल्याते समजते. तसेच विकी कौशलही यात काम करणार असल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रोहित शेट्टीच्या या चित्रपटात विकी कौशल, रणवीर सिंग आणि अक्षय कुमार, हे देखील अजय देवगणसोबत झळकणार आहेत.