Asthma: ‘अस्थमा’ च्या रुग्णांनो घ्या इझी श्वास , दम्यावरील प्रभावी उपचारांचा संशोधकांचा दावा! जाणून घ्या, काय आहे संशोधन

| Updated on: Jul 05, 2022 | 6:25 PM

Asthma Research: दमा रुग्णांसाठी उपयोगी ठरेल असे संशोधन करण्यात आले आहे. संशोधकांनी लघवीची चाचणी करून दम्यावर उत्तम उपचार कसे करता येतील हे शोधून काढले आहे. या नवीन शोधामुळे दम्याच्या रुग्णांना श्वास घेणे सोपे होऊ शकते, संशोधकांनी दम्यावरील प्रभावी उपचारांचा दावा केला आहे.

Asthma: ‘अस्थमा’ च्या रुग्णांनो घ्या इझी श्वास , दम्यावरील प्रभावी उपचारांचा संशोधकांचा दावा! जाणून घ्या, काय आहे संशोधन
अस्थमा रुग्णांसाठी नवे संशोधन वरदान
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

दमा हा एक असा आजार आहे जो फुफ्फुसांवर बराच काळ परिणाम करतो. दमा हा फुफ्फुसाचा एक सामान्य आजार आहे ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो.संशोधकांनी दम्यावरील प्रभावी उपचारांच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे. यामुळे जगभरातील 262 कोटीहून अधिक अस्थमा रुग्णांना (Asthma patients) श्वास घेणे सोपे होऊ शकते. ऑस्ट्रेलियातील एडिथ कोवन विद्यापीठाने नुकत्याच केलेल्या अभ्यासाचे निष्कर्ष युरोपियन रेस्पिरेटरी जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत. अभ्यासाचे नेतृत्व ECU च्या डॉ. स्टेसी रेन्के आणि स्वीडनमधील कॅरोलिंस्का इन्स्टिट्यूटचे डॉ. क्रेग व्हीलॉक यांनी केले. संशोधकांच्या टीमला गंभीर दमा असलेल्या रुग्णांमध्ये वेगळ्या प्रकारचे जैवरासायनिक (Biochemical) (मेटाबोलाइट) आढळून आले. हे लघवीच्या चाचणीद्वारे (By urine test) शोधले जाऊ शकते. फुफ्फुसातील जैवरासायनिक बदल रक्तात प्रवेश करतात आणि लघवीद्वारे उत्सर्जित होतात. म्हणजेच लघवीतील मेटाबोलाइटची उपस्थिती तपासून गंभीर दम्याच्या रुग्णांवर अचूक उपचार करता येतात.त्यांनी अभ्यासासाठी 11 देशांतील 600 सहभागींच्या लघवीची तपासणी केली. या वेळी, टीमने एक विशेष प्रकारचा मेटाबोलाइट शोधला, ज्याला कार्निटिन म्हणतात. तीव्र दम्यामध्ये त्याची उपस्थिती कमी होते. कार्निटाईन्स पेशींमध्ये ऊर्जा निर्माण करण्यात आणि रोगप्रतिकारक शक्ती सक्रिय करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

दम्याच्या उपचारासाठी नवीन शोध

संशोधनाचे प्रमुख डॉ. रेनके म्हणाले की, अभ्यासाचे निष्कर्ष दम्यावरील उपचारांच्या नवीन पद्धती विकसित करण्यासाठी उपयुक्त ठरतील. फुफ्फुसातील जैवरासायनिक बदल रक्तात प्रवेश करतात आणि लघवीद्वारे उत्सर्जित होतात. म्हणजेच लघवीतील मेटाबोलाइटची उपस्थिती तपासून गंभीर दम्याच्या रुग्णांवर अचूक उपचार करता येतात.

हे सुद्धा वाचा

काय आहे आजार

दमा हा एक असा आजार आहे जो फुफ्फुसांवर बराच काळ परिणाम करतो. दमा हा फुफ्फुसाचा एक सामान्य आजार आहे ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. हा आजार कोणत्याही वयोगटातील लोकांना प्रभावित करू शकते आणि सामान्यतः बालपणापासून सुरू होतो. काही लोक, विशेषतः लहान मुले, हळूहळू दम्याच्या स्थितीतून बाहेर येऊ शकतात. परंतु बहुतेक लोकांसाठी हा आजीवन आजार आहे.

दम्याची लक्षणे

घरघर (श्वास घेताना शिट्टीचा आवाज)
धाप लागणे
छातीत घट्टपणा – जणू कोणीतरी दोरी बांधली आहे.
खोकला
दम्याच्या लक्षणांची तीव्रता व्यक्तीपरत्वे बदलते. ते येतात आणि जातात, परंतु काही लोकांमध्ये ते कायम असतात.
अस्थमाच्या लक्षणांमुळे काही वेळेस खूप वाईट परिस्थिती निर्माण होते. याला अस्थमा अटॅक म्हणतात.

दमा होण्याची कारणे

दमा हा श्वसननलिका सुजल्याने, होतो, ज्याचे कार्य म्हणजे फुफ्फुसातून हवा बाहेर काढणे आणि आत घेणे. श्ससननलिका सुजस्याने, ती खूप संवेदनशील बनते, त्यामुळे ते तात्पुरते थोडेसे संकुचित होते. हे कधीही, किंवा ट्रिगरच्या संपर्कात आल्यानंतर होऊ शकते. कधीकधी ही नळी श्लेष्मामुळे ब्लॉक होऊ शकते.

दम्याची काही सामान्य कारणे

घरातील धुळ, प्राण्यांचे केस आणि परागकण यासारख्या ऍलर्जी निर्माण करणारे घटक
इतर त्रासदायक, जसे की तीक्ष्ण सिगारेटचा धूर, गॅस आणि थंड हवा
आणि वेगाने केलेला व्यायाम. या कारणामुळे दम्याचा त्रास होऊ शकतो.