रोज अनुलोम-विलोम प्राणायाम करण्याचे फायदे काय?

| Updated on: Dec 15, 2024 | 3:10 PM

प्रत्येक दिवशी अनुलोम-विलोम प्राणायाम केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. हृदयाचे आरोग्य, पचनतंत्र, मानसिक ताण कमी करणे, आणि श्वासोच्छ्वासाच्या समस्यांवर नियंत्रण ठेवणे यासारखे फायदे मिळतात. त्यामुळे हे प्राणायाम दररोज करण्याचा अभ्यास केल्यास त्याचे फायदे अनुभवता येतात.

रोज अनुलोम-विलोम प्राणायाम करण्याचे फायदे काय?
प्रतिकात्मक छायाचित्र
Image Credit source: Instagram
Follow us on

तुम्ही शहरात राहा किंवा खेड्यात राहा, हल्लीची जीवनशैली सपाटून बदलून गेली आहे. प्रत्येकाचं जीवन हे धकाधकीचं झालं आहे. त्यामुळेच आता शरीर आणि मनाच्या तंदुरुस्तीसाठी रोज योगा आणि प्राणायाम करणं आवश्यक झालं आहे. प्रत्येक प्राणायामाचे फायदे वेगवेगळे असतात. त्यापैकीच अत्यंत महत्त्वाचे प्राणायाम म्हणजे अनुलोम-विलोम. अनुलोम-विलोम प्राणायामाचे फायदे काय आहेत? हा प्राणायाम कधी करायचा असतो, त्याचीच माहिती आज आपण घेणार आहोत.

अनुलोम-विलोम प्राणायाम कसा करावा?

  • अनुलोम-विलोम प्राणायाम फार कठिण नाही. हा प्राणायाम करण्यासाठी सर्वात आधी आरामदायक आसनात बसावे लागते. या प्राणायामात पाठ सरळ आणि आरामदायक ठेवणे महत्त्वाचे आहे.
  • प्रथम, आपल्या उजव्या अंगठ्याने उजव्या नाकाचा भाग बंद करा.
  • नंतर, डाव्या नाकाच्या भागाने श्वास घ्या.
  • श्वास घेतल्यावर, उजव्या नाकाने श्वास सोडून द्या.
  • आता डाव्या नाकाचा भाग बंद करा आणि उजव्या नाकाने श्वास घ्या.
  • यानंतर, डाव्या नाकाने श्वास सोडा.
  • श्वास आत घेणे आणि सोडणे हे काही वेळ करा. त्यानंतर हळूहळू 15 ते 30 मिनिटांपर्यंत ते करा. हा प्राणायाम श्वास आणि शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतो.

अनुलोम-विलोमचे फायदे

हृदयाचे आरोग्य :

अनुलोम-विलोममुळे रक्ताभिसरण सुधारते आणि रक्तदाब नियंत्रित राहतो. रक्तदाब नियंत्रणात राहणं हृदयासाठी अत्यंत फायदेशीर असतं. त्यामुळे हृदयाचे कार्य अधिक चांगले होते आणि हृदयविकाराच्या जोखमीपासून संरक्षण मिळते.

मानसिक ताण कमी होणे :

दररोज अनुलोम-विलोम केल्याने मानसिक ताण कमी होतो. तणाव आणि नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवण्यास त्याने मदत होते. त्यामुळे तुमच्या मनाची स्थिती शांत राहते. अंगी परिपक्वता येते.

हे सुद्धा वाचा

पचनतंत्र सुधारते :

अनुलोम-विलोम प्राणायाम पचनतंत्रासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे पचन सुधारते, गॅस, अपचन, पोट फुगणे, इत्यादी समस्या दूर होतात.

श्वासांशी संबंधित समस्यांवर कमी होणे :

अनुलोम-विलोम प्राणायाम श्वास आणि श्वसन तंत्रासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे दमा, खोकला कमी होतो. हा प्राणायाम रोज केल्याने श्वासोच्छ्वासाच्या समस्या दूर होतात.

सर्दी आणि नाक जाम होणे :

काही लोकांना सर्दीची समस्या असते. त्यांना नाक जाम होणे, नाकातून वास आणि गंध येणे अशा समस्या असतात. या समस्यांवर अनुलोम-विलोम प्राणायाम हा प्रभावी उपाय आहे. कारण हा प्राणायाम श्वासाच्या मार्गाला मोकळे ठेवतो आणि सर्दीमुळे होणारी नाक जाम होण्याची समस्या दूर करते.

( डिस्क्लेमर – अनुलोम-विलोम प्राणायाम दररोज योग्य पद्धतीने करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्राणायाम आणि योगासने करण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळवणे आवश्यक आहे. हा प्राणायाम मनाने करू नका. त्यामुळे योग प्रशिक्षक किंवा तज्ंज्ञाच्या मार्गदर्शनाखाली प्राणायामाचे योग्य प्रकार शिकणे फायदेशीर ठरेल. )