एस्पिरिन गोळीच्या सेवनाने हार्ट अटॅकला रोखता येऊ शकतो. यासंदर्भात अनेकदा बोलले आणि लिहीले गेले आहे. छातीत अचानक खूपच दुखत असेल आणि अस्वस्थ वाटत असेल तर चार तासांच्या आत एस्पिरिनची गोळी घ्यावी. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होऊ प्राण वाचू शकतात यावर जर्नल ऑफ अमेरिकन हार्ट असोसिएशनने केलेल्या अभ्यासात पुन्हा एकदा संशोधन प्रसिद्ध झाले आहे. अर्थात एस्पिरिन गोळी तूम्ही अत्यंत सावधानता पूर्वक घेतली पाहीजे असेही डॉक्टरांनी म्हटले आहे. ज्यांना एलर्जी असेल त्यांनी जास्त काळ ही गोळी घेऊ नये असाही सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
अमेरिकेत यासंदर्भात एक अभ्यास करण्यात आला, वेळेआधी हृदयाचा धक्का बसल्यास आणि छातीतून खूपच कळा आल्यास सेल्फ एडमिनिस्ट्रेशनवर झालेल्या अभ्यासातून एक निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्यात 325 मिलीग्राम एस्पिरिनच्या प्रारंभिक सेवनाने साल 2019 अमेरिकेत 13,980 एक्युट मायोकार्डियलने होणारे मृत्यूचे प्रमाण घटल्याचे पुढे आले आहे.
एस्पिरिन गोळी तूम्ही अत्यंत सावधानता पूर्वक घेतली पाहीजे. जेव्हा रुग्णाला खूप जोराने छातीत काही तरी तुटल्यासारखे दुखत असेल आणि घाम आला असेल तसेच चक्कर येत असेल तर अशावेळी 325 एमजीची एस्पिरिनच्या तीन गोळ्या क्रशकरून लागलीच खाऊ शकता. त्याशिवाय तुम्ही अतिरिक्त 5 एमजी सोरबिट्रेट देखील जिभेखाली ठेवू शकता त्यामुळे छातीत कळा कमी होतील.
आपल्याला छातीत कळा येऊन अस्वस्थ वाटत असेल. बाहूंमध्ये, मान आणि जबड्यात वात आला असेल, श्वास घेण्यास त्रास होत असेल, घाम आला असेल आणि चक्कर येत असेल तर ही हार्ट एटॅकची संभाव्य लक्षणे असल्याने अशा लक्षणावेळी एस्पिरिन गोळी खाण्याचा सल्ला दिला जातो असे अपोलो एओर्टिक प्रोग्रॅमचे वरिष्ठ सल्लागार आणि सर्जिकल प्रमुख डॉ. निरंजन हिरेमठ यांनी सांगितले. एस्पिरिनची गोळी रक्त पातळ करण्यास आणि रक्ताच्या गाठी बनण्यास प्रतिरोध करते असेही त्यांनी सांगितले.
‘ॲस्पिरिन सायक्लो-ऑक्सिजनेस प्रतिबंधित करून अँटी-प्लेटलेट एजंट म्हणून कार्य करते, ज्यामुळे थ्रोम्बोक्सेन ए 2 चे उत्पादन कमी होते, एक अणू जो प्लेटलेट एकत्रीकरण आणि व्हॅसोकॉन्स्ट्रक्शनला प्रोत्साहन देतो, असे धर्मशिला नारायण रुग्णालयाच्या कार्डिओलॉजीचे संचालक आणि वरिष्ठ सल्लागार डॉ. समीर कुब्बा यांनी म्हटले आहे.
रक्ताच्या गुठळ्या बनण्याची क्रिया रोखण्यास मदत करण्यासाठी छातीत कळ आल्यानंतर लागलीच एस्पिरिनची गोळी खायला हवी असेही त्यांनी सांगितले. मात्र ज्या लोकांना एस्पिरिन गोळीची एलर्जी आहे त्यांनी सावधान रहायला हवे. आम्ही इतर नॉन-स्टेरॉइडल अँटी-इंफ्लेमेटरी ड्रग्स, तसेच सक्रिय गॅस्ट्रोइंटेस्टाइनल रक्तस्त्राव, रक्तस्त्राव विकार किंवा गॅस्ट्रोइंटेस्टाइनल अल्सर किंवा रक्तस्त्राव स्ट्रोकचा इतिहास असलेल्या लोकांना ऍस्पिरिन गोळी टाळण्याची शिफारस करतो असे श्री बालाजी एक्शन मेडीकल इन्स्टिट्यूटमधील इंटरवेंशनल कार्डिओलॉजी सल्लागार डॉ. संजय परमार यांनी सांगितले आहे.
एस्पिरिनच्या साईड इफेक्टने रक्तस्राव होऊ शकतो. परंतू सर्वसाधारणपणे एका डोसने असे होण्याची शक्यता खूपच कमी असते असे मॅक्स सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे हृदय विज्ञान गटाचे अध्यक्ष डॉ.बलबीर सिंह यांनी सांगितले. पेप्टिक अल्सर असेल तर एस्पिरिन अधिक रक्तस्राव होण्यास जबाबदार ठरू शकते. अशा वेळी पेशंटला रुग्णालयात भरती केले जाणार असल्याने आपात्कालिन स्थितीत एस्पिरिन फायदेशीर होऊ शकते असे डॉ. बलबीर सिंह यांनी सांगितले. जर रुग्णामध्ये हृदयरोगाचा किंवा पक्ष घाताचा कोणताही इतिहास नसेल तर खूप काळ एस्पिरिन खाणे धोकादायक ठरु शकते असाही सल्ला सर गंगाराम रुग्णालयाच्या कार्डिओलॉजिस्ट विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. अश्विनी मेहता यांनी सांगितले. अशा रुग्णामध्ये रक्तस्रावाची जोखीम हृदय विकाराचा धक्का रोखण्यापेक्षा अधिक गंभीर असू शकते असेही मेहता यांनी सांगितले.