नवी दिल्ली : देशात गेल्या काही काळापासून हृदयविकार आणि हार्ट ॲटॅकच्या (heart attack) प्रकरणांमध्ये वेगाने वाढ होत आहे. हृदयाशी संबंधित आजार हे काही एका विशिष्ट वयोगटातील लोकांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. मधुमेह, जाडेपणा, लठ्ठपणा, हाय ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल (cholesterol) यांसारखे आजार हे हृदयविकराला (heart disease) निमंत्रण देतात. त्याशिवाय ॲथेरोस्क्लेरोसिस हीसुद्ध अशी एक कंडीशन आहे, ज्यामुळे लोकं अचानक हार्ट ॲटॅकला बळी पडू शकतात. यामध्ये धमन्या (arteries) कडक होतात आणि त्यामुळे रक्तप्रवाह कमी होतो, जे नंतर हार्ट ॲटॅकसाठी कारणीभूत ठरू शकते.
डेन्मार्कमध्ये केलेल्या एका संशोधनात असे आढळून आले आहे की जर तुम्हाला ॲथेरोस्क्लेरोसिस असेल तर हृदयविकाराचा धोका आठ पटीने जास्त असू शकतो.
ॲथेरोस्क्लेरोसिस का असते धोकादायक ?
ॲथेरो म्हणजे चरबी आणि स्क्लेरोसिस म्हणजे जमा होणे. जर हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये चरबी किंवा कोलेस्टेरॉल जमा होत असेल तर या स्थितीला ॲथेरोस्क्लेरोसिस म्हणतात. यामध्ये रक्तवाहिन्या ब्लॉक होतात आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. जर एथेरोस्क्लेरोसिस यकृतामध्ये असेल तर त्याला फॅटी लिव्हर फेल्युअर म्हणतात आणि जर ते किडनीमध्ये असेल तर त्याला किडनी फेल्युअर असे म्हटले जाते. परंतु या आजाराची सर्वात भयावह गोष्ट म्हणजे त्याची लक्षणे लवकर दिसून येत नाहीत आणि त्यामुळे बहुतांश रुग्णांना या आजाराची माहिती नसते.
डेन्मार्कच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिस (NHS) नुसार, या स्थितीत तुमच्या धमन्यांमध्ये हळूहळू चरबी जमा होते, त्यामुळे त्या अरुंद होतात आणि त्यानंतर रक्तप्रवाह कठीण होतो.
कोणत्याही लक्षणांशिवाय येतो हा आजार
या आजाराची लक्षणे अनेक लोकांमध्ये दिसत नाहीत पण त्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका वाढतो. ॲनल्स ऑफ इंटर्नल मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात असे म्हटले आहे की, अनेक लोकांना लहान वयातच ॲथेरोस्क्लेरोसिस हा आजार जन्माला येतो, पण त्यांना हृदयविकाराचा झटका येईपर्यंत दीर्घकाळ कोणतीही लक्षणे दिसत नाहीत.
संशोधनात आढळले धक्कादायक निष्कर्ष
कोपनहेगन, डेन्मार्क येथील संशोधकांनी 40 किंवा त्याहून अधिक वयाच्या 9,000 हून अधिक लोकांचा अभ्यास केला. या लोकांना हृदयविकाराचा कोणताही त्रास नव्हता ज्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता हे समजू शकेल. अभ्यासासाठी, त्यांनी संगणकीय टोमोग्राफी अँजिओग्राफी वापरली, ज्यामध्ये त्यांनी त्या लोकांच्या हृदयाचा आणि रक्तवाहिन्यांचा संपूर्ण एक्स-रे केला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यापैकी 46 टक्के लोकांमध्ये सबक्लिनिकल कोरोनरी ॲथेरोस्क्लेरोसिसची स्थिती आढळून आली.
येथे सबक्लिनिकल म्हणजे रोगामध्ये स्पष्ट लक्षणे दिसून येत नाहीत. या सहभागींवर एक महिना ते नऊ वर्षांच्या दरम्यान केलेल्या संशोधनात 71 जणांना हृदयविकाराचा झटका आला आणि 193 जणांचा मृत्यू झाला. संशोधकांनी असा निष्कर्ष काढला की ज्यांना ऑब्स्ट्रक्टिव्ह कोरोनरी ॲथेरोस्क्लेरोसिस आहे त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका आठ पटीने जास्त आहे.
ॲथेरोस्क्लेरोसिस टाळण्यासाठी काय करावे
फॅट्स, कार्बोहायड्रेट्स आणि साखर असलेले पदार्थ मर्यादित प्रमाणात सेवन करावेत. नियमित व्यायाम करा. सकस आहार घ्या आणि वजन नियंत्रणात ठेवा. मधुमेहाच्या रुग्णांनी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवावी. दारू आणि धूम्रपान टाळा. व्यायाम करताना किंवा चालताना छातीत दुखत असेल, दाब पडत असेल किंवा हात आणि पाय दुखत असतील तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.