Breakfast Mistakes : आपल्या दिवसाची सुरूवात कशी होते यावरूनच आपला संपूर्ण दिवस कसा जाईल हे स्पष्ट होते. जर सकाळ चांगली झाली अख्खा दिवस चांगला जाण्याची शक्यता असते. असंच काहीसं आपल्या आरोग्याबाबतही म्हणता येऊ शकतं. विशेषत: आपल्या ब्रेकफास्ट (breakfast) बद्दल असं म्हटलं जातं की त्याचा आपल्या शरीरावर सर्वात जास्त परिणाम होतो कारण त्यानेच आपल्या दिवसाची सुरूवात होते. आपल्या शरीराला दिवसभर काम करण्यासाठी पुरेशी उर्जेची आवश्यकता असते, ती आपल्या ब्रेकफास्टमधूनच मिळते. त्यामुळे योग्य नाश्ता करणे महत्वाचे ठरते. पण काही लोकं हे ब्रेकफास्ट किंवा न्याहारीमध्ये काही चुका करतात (avoid these things in breakfast) ज्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. निरोगी राहण्यासाठी नाश्त्यामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश करू नये ते जाणून घेऊया.
सकाळची सुरूवात कॅफेनने करू नका
काही लोक सकाळी उठताच चहा किंवा कॉफी पितात. मात्र ही सवय अतिशय अयोग्य आहे. जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफीचे सेवन केले तर शरीरातील कोर्टिसोलची पातळी वाढू शकते ज्यामुळे तुम्ही आजारी पडू शकता. याशिवाय सकाळी कॉफी प्यायल्याने हार्मोनल संतुलन बिघडते आणि ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो.
सकाळीच फळांचा ज्यूस पिणेही घातक ?
सकाळी रिकाम्या पोटी फळांचे ज्यूस पिण्याची सवयही घातक ठरू शकते. दिवसभरात तुम्ही ताज्या फळांचा रस पिऊ शकता. पण सकाळी रिकाम्या पोटी फ्रूटज्यूस पिण्याची चूक बिलकूल करू नका. कारण यामुळे शरारातील साखरेच्या पातळीचे संतुलन बिघडू शकते. ज्यूस प्यायचाच असेल तर ब्रेकफास्ट केल्यानंतर त्याचे सेवन करावे.
जंक फूड
काही लोकं सकाळी-सकाळी ब्रेकफास्टमध्ये सँडविच खातात. पण चांगले आरोग्य हवे असेल तर सकाळच्या नाश्त्यामध्ये फास्ट फूड किंवा जंक फूडचे सेवन करू नका. सँडविच, पिझ्झा, बर्गर आणि सॉसेज वगैरे पदार्थ खाऊन शरीरातील फॅट्स वाढू शकतात. त्यामुळे सकाळी अशा पदार्थांचे सेवन न करणेच उत्तम ठरते.
व्हाईट ब्रेड
जगभरातील बहुतांश लोक हे सकाळी नाश्त्यामध्ये व्हाईट ब्रेडचे सेवन करत असतात. पण आरोग्य तज्ज्ञांच्या मते असे करणे अतिशय घातक ठरू शकते. खरंतर पांढरा ब्रेड हा मैद्यापासून बनतो, आणि त्याच्या जास्त सेवनामुळे तुमचे पाचनतंत्र बिघडू शकते.तसेच त्यामध्ये पोषक गुणधर्मही अतिशय कमी असतात. म्हणून तो जास्त खाऊ नये.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)