नवी दिल्ली – मासिक पाळी (period) ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जी महिलांमध्ये दर महिन्याला येते. मासिक पाळीचे पहिले तीन दिवस बहुतांश स्त्रियांसाठी त्रासदायक असतात. मासिक पाळी दरम्यान, बहुतेक महिलांना ओटीपोटात दुखणे, मसल क्रॅम्प्स (cramps),पाठदुखी, पाय आणि मांड्या दुखणे असा त्रास जाणवतो. मासिक पाळी दरम्यान, आपले शरीर असे हार्मोन (hormones) तयार करते ज्यामुळे गर्भाशय आकुंचन पावते व गर्भाशयाचे अस्तर बाहेर टाकण्यास मदत करते. या आकुंचनामुळे स्त्रियांना क्रॅम्प्स जाणवतात. या हार्मोन्समुळे पाय दुखणे, पाठदुखी, मांड्यामध्ये वेदना होणे, असा त्रास होतो.
या काळात खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यावी लागते. ठराविक पदार्थांचे सेवन केल्याने मासिक पाळीत वेदना वाढू शकतात. अशा वेळी आहाराकडे विशेष लक्ष देणे महत्वाचे ठरते. आहारातील काही पदार्थ टाळून तुम्ही क्रॅम्प्सची समस्या दूर करू शकता. या काळात काही पदार्थांचे सेवन केल्याने मासिक पाळीचे दुखणे वाढण्याची समस्या वाढू शकते. मासिक पाळी दरम्यान कोणते पदार्थ टाळावे हे जाणून घेऊया.
गार पदार्थ टाळा
मासिक पाळीत वेदना आणि अस्वस्थता वाढत असेल तर तुम्ही थंड पदार्थांचे सेवन करणे टाळा. थंड पदार्थांमध्ये थंड पेय, आईस्क्रीम, दही, ताक यांचे सेवन टाळावे. तसेच आंबट फळे आणि फ्रीजमध्ये ठेवलेल्या गोष्टींचे सेवन टाळा, यामुळे तुम्हाला क्रॅम्प्स आणि वेदनापासून आराम मिळेल.
जड, मसालेदार पदार्थांचे सेवन टाळा
मासिक पाळीदरम्यान पचनक्रिया बिघडू लागते आणि पोट बिघडण्याची समस्या वाढू शकते. त्यामुळे मासिक पाळीच्या काळात भरपूर अन्न खाणे, मांस, तेलकट पदार्थ, मसालेदार अन्न, दूध आणि चहा पिणे टाळावे. या सर्व पदार्थांचे सेवन केल्याने पचनक्रिया बिघडू लागते आणि पोटात समस्या निर्माण होऊ शकतात.
कॉफी, चहा आणि दुधाचे कमी सेवन करा
या काळात चहा, कॉफी आणि दुधाचे सेवन कमी करा. दूध, चहा आणि कॉफीमुळे ॲसिडिटीची समस्या वाढू शकते, त्यामुळे त्यांचे कमी प्रमाणात सेवन करावे. कॉफी आणि चहामध्ये असलेले कॅफिन यामुळे क्रॅम्पस वाढू शकतात. त्यामुळे मासिक पाळीच्या काळात कॅफेनयुक्त पदार्थ आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन कमी करावे.
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)