हिवाळ्यात ‘या’ फळांचे सेवन तुमच्या आरोग्यासाठी घातक? एकदा नक्की वाचा…

| Updated on: Dec 31, 2024 | 6:00 PM

हिवळ्या सुरु होताच अनेक संसर्गाचे आजार होण्याची शक्यता असते. परंतु शरीतातील रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत झाल्यामुळे तुम्हाला सर्दी, खोकला, ताप यांच्या सरखे आजोर होण्याची शक्यता असते. फळांचे सेवन आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते. फळांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटिन, फायबर आणि अँटिऑक्सिडेंट्स असतात ज्यामुळे तुमचं आरोग्य निरोगी राहातं. परंतु काही असे फळं आहेत ज्याचे हिवाळ्यात सेवन केल्यामुळे तुम्हाला अनेक आजार होऊ शकतात.

हिवाळ्यात या फळांचे सेवन तुमच्या आरोग्यासाठी घातक? एकदा नक्की वाचा...
mix fruit
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

हिवाळा सुरु होताच वातावरणामध्ये गारवा निर्माण होतो. वातावरणामधील गारव्यामुळे तुम्हाला अनेक संसर्गाचे आजार होऊ शकतात. हिवाळ्यात तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत असेल तर तुम्हाला आजार होण्याची शक्यता आहे. वातावरणात थंडी असल्यामुळे तुम्हाला गरम आणि उबदार कपडे घालणे फायदेशीर ठरते. हिवाळ्यात तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी योग्या आहाराचे सेवन करणे गरजेचे असते. तुमच्या आहारामध्ये प्रोटिन, फायबर, अँटिऑक्सिडेंट्स, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचा समावेश केल्यामुळे तुमचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते.

निरोगी आरोग्यासाठी फळांचे सेवन अत्यंत गरजेचे असते. फळांमध्ये शरीरासाठी उपयुक्त जीवनसत्वे, अँटिऑक्सिडेंट्स आणि फायबर असतात ज्यामुळे तुमच्या शरीराला योग्य पोषण मिळते. फळांचे सेवन केल्यास तुम्हाला कोणत्यही प्रकारचे संसर्गाचे आजार होत नाहीत. फळांमुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढते. परंतु मार्केटमध्ये काही अशी फळं आहेत ज्यांचे हिवाळ्यात सेवन तुमच्या आरोग्यासाठी गंभीर ठरु शकतो. कही फळांमध्ये शरीराला थंड करण्याचे गुणधर्म असतात ज्यामुळे शरीरातील उर्जा निघून जाते.

हिवाळ्यात ‘या’ फळांचे सेवन करु नये :

कलिंगड – आपल्यामधील अनेकांना कलिंगड खाण्यास आवडतो. परंतु कलिंगड उन्हाळ्यात खाल्लं जाणारे फळ आहे. त्याचे कारण म्हणजे. कलिंगड तुमच्या शरीरातील उर्जा कमी करून शरीराला थंड ठेवण्यास मदत करतो. त्यासोबतच कलिंगडमध्ये थंड गुणधर्म असतात ज्यामुळे तुम्हाला सर्दी, खोकला यांच्या सारखे आजार होण्याची शक्यता असते.

संत्री – संत्रीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते ज्यामुळे तुमचे आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. तुमच्या शरीरातील व्हिटॅमिन सीचे प्रमाण कमी झाल्यामुळे तुम्हाला अनेक संसर्गाचे आजार होऊ शकतात. परंतु, हिवाळ्यात जास्त प्रमाणात संत्रीचे सेवन केल्यामुळे तुम्हाला खोकला किंवा घस्याचे त्रास होऊ शकतात.

अननस – अनेकांना अननस खाण्यास आवडतं. परंतु, हिवाळ्यात अननस खाणं तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. अननसामध्ये ब्रोमेलेन नावाचं एन्झाईम आढळतं ज्यामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती कमी आणि कमकुवत होते. हिवाळ्यात रोगप्रतिकारकशक्ती कमकुवतत झाल्यामुळे तुम्हाला संसर्गाचे आजजार होऊ शकतात.

पपई – पपई आपल्या आरोग्यासाठी सर्वोत्तम मनली जाते. पपई खाल्ल्यामुळे तुमच्या पोटा संबंधीत समस्या सुधारतात त्यासोबतच तुम्हाला पचनासंबंधी त्रास होत असल्यास पपई फायदेशीर ठरते. परंतु पपईचे सेवन केल्यामुळे तुमची रोगप्रतिकारकशक्ती कमकुवच होते. शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत झाल्यामुळे तुम्हाला अनेक आजार होऊ शकतात.

द्राक्ष – हिवाळ्यात द्राक्ष खाण तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतं. द्राक्षामध्ये भरपूर प्रमाणात साखर असते. ज्यामुळे मधुमेह वाढण्याची शक्यता असते. त्योसोबतच द्राक्ष अनेकवेळा चवीला अंबट असतात ज्यामुळे तुम्हाला खोकला, घशाचा त्रास आणि सर्दी यांच्या सरखे आजार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिवाळ्यामध्ये द्राक्ष खाऊ नये.

हिवाळ्यामध्ये तुम्ही रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी दररोज सकाळी नियमित व्यायाम करा. व्यायाम केल्यामुळे तुमच्या शरीरात उर्जा निर्माण होते त्यासोबतच हिवाळ्यात रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही योग्य आहाराचे सेवन करणे गरजेचे असते. त्योसोबतच तुमच्या निरोगी शरीरासाठी चालणे खुप महत्त्वाचे असते. दररोक सकाळी अर्धातास चालल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये उर्जा निर्माण होते आणि तुमचं चयापचय सुधारण्यास देखील मदत होते.