नवी दिल्ली | 11 सप्टेंबर 2023 : अयोग्य राहणीमान आणि चुकीचा आहार यामुळे वजन वाढण्याची समस्या वाढली आहे. तसेच रात्रीचे उशीरा जेवण, व्यायामाचा अभाव यामुळे देखील लठ्ठपणाला आमंत्रण देत असते. तज्ज्ञांच्या मते जेवल्यानंतर लागलीच झोपणे चकीचे आहे. रात्री जेवण घेतल्यानंतर लागलीच झोपल्याने पचनाच्या क्रीयेवर परीणामा होऊन वजन वाढायला सुरुवात होते. जेवल्यानंतर शतपावली करणे खुपच फायद्याचे असते. त्यामुळे रात्री झोपताना आपण नेमक्या काय गोष्टी टाळायला हव्यात ते पाहूयात…
शरीराला हायड्रेट राखण्यासाठी पाणी पिणे गरजेचे असते. परंतू जेवल्यानंतर लागलीच पाणी पिण्याने जेवण पचत नाही. जेवणानंतर जेवण पचायला कमीत कमी दोन तास लागतात. त्यादरम्यान जर आपण पाणी पिले तर पचनप्रक्रीयेवर परिणाम होतो. त्यामुळे जेवल्यानंतर 45 ते 65 मिनिटानंतर पाणी प्यायला हवे. जेवणाआधी पाणी प्यायचे असेल तर ते अर्ध्यातासांपूर्वी प्यायला हवे.
काही जणांना जेवल्यानंतर चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. लागलीच जेवणानंतर कोणतेही उत्तेजक पेय पिणे योग्य नाही. कॉफीत कॅफीन असते. त्यामुळे जेवणानंतर चहा किंवा कॉफी घेतल्यास जेवणाच्या पचनावर विपरित परिणाम होतो. त्यामुळे गॅस आणि एसिटीडीचा त्रास सुरु होऊ शकतो.
जेवणानंतर लागलीच झोपल्यास जेवण पचत नाही. त्यामुळे वजन वाढते. त्यामुळे एसिडीटी, जळजळ, अपचन होते. जेवण आणि झोपे दरम्यान तीन ते चार तासांचा गॅप हवा.
काही जणांना रात्री उशीरा जेवणाची सवय असते. कामाच्या धावपळीत लोक रात्री उशीरा जेवत असतात. त्यामुळे सहाजिकच जेवल्यानंतर ते लागलीच झोपतात. याच एका चुकीने तुमचे वजन वाढते. रात्रीचे जेवण झोपण्यापूर्वी 2-3 तासांपूर्वी घेतले पाहिजे. रात्रीचे जेवण रात्री 7-8 दरम्यान झाले पाहीजे. म्हणजे रात्री 10-11 वाजता झोपता आले पाहीजेत. तरच तुम्ही सकाळी लवकर उठून ताजे तवाने दिसू शकाल.
जर तुम्हाला रात्री उशीराच जेवायचे असेल तर अगदी पचायला हलके असलेले साधे जेवण खावे. आपण डीनरला फायबर अधिक असलेले पदार्थ खावेत. भाजी आणि सलाडचा वापर करा. त्यामुळे जेवण पचेल. जेवल्यानंतर शतपावली करायला विसरु नका, काही पावले तरी चालाच थेट बिछान्यावर पडू नका.