नवी दिल्ली – आपले जेवण चविष्ट आणि हेल्दी (healthy food) बनावे यासाठी आपण काय-काय करत नाही. स्वयंपाक करताना आपण त्यात वेगवेगळे मसाले आणि पदार्थ घालतो, त्यामुळे अन्न चविष्ट आणि पौष्टिक (nutrition) होईल. मात्र, अनेक वेळा आपण अशा अनेक छोट्या-छोट्या चुका (mistakes) करतो, ज्यामुळे आपल्या अन्नातील आवश्यक पोषक तत्वं नष्ट होतात. बाजारातून भाज्या किंवा फळे विकत घेण्यापासून ते तयार शिजवेपर्यंत अशा अनेक चुका करतो- ज्यामुळे आपल्या अन्नातील पोषक तत्वे नष्ट होतात.
या सदंर्भात नुकताच एक अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. आपल्या काही चुकांमुळे अन्नपदार्थांमधून पोषक तत्वं निघून जातात. कोणत्या चुका करणे टाळावे ते जाणून घेऊया.
या सवयी बदला
फ्रोझन (गोठवलेल्या) पदार्थांमध्ये अधिक पोषक तत्वं : काही प्रकरणांमध्ये, आपल्याला ताजी फळं आणि भाज्यांऐवजी फ्रोजन फूड म्हणजेच गोठवलेल्या अन्नातून अधिक पोषक तत्वं मिळवू शकता. मटारसारख्या भाज्या सोलून झाल्यानंतर लगेच गोठवण्यातच येतात, जी सुमारे 95 टक्के पोषक टिकवून ठेवतात.
कडधान्यांचा समावेश करा : जेव्हा तुम्ही फळे आणि भाज्या खरेदी करण्याचा विचार कराल तेव्हा आहारात हिरव्या डाळी, चणे आणि बटर बीन्स यांचा समावेश करण्याचा प्रयत्न करा. डाळींमध्ये अनेक खनिजे, प्रथिने आणि तंतू आढळतात, जी आरोग्यासाठी लाभदायक असतात.
भाज्या अशा कापाव्यात : भाज्या चिरताना त्यांचे मोठे तुकडे करावेत. छोटे तुकडे केल्यास ते उष्णतेच्या संपर्कात लवकर येतात. त्यामुळे पोषक घटकांचे जलद नुकसान होऊ शकते.
योग्य प्रकारे करा स्वयंपाक : शिजवलेल्या टोमॅटोमध्ये कॅन्सरशी लढणारे लाइकोपीन असते. तसेच गाजर आणि रताळं शिजवल्याने त्यातील बीटा-कॅरोटीनचे प्रमाण वाढू शकते, जे आपल्या रोगप्रतिकारक कार्याशक्तीस सपोर्ट करते. या अहवालानुसार, स्वयंपाक करताना वेळेची योग्य काळजी घ्यावी. अन्न जास्त वेळ शिजवल्याने त्यातील पोषक तत्वं नष्ट होतात.
अन्न वाफवू शकता : पदार्थ डायरेक्ट शिजवू नयेत. अन्नातील पोषक तत्वं टिकवण्यासाठी तुम्ही अन्नपदार्थ वाफवून किंवा फ्राय करून खाऊ शकता. स्टीमरमधील उरलेले पाणी तुम्ही भात अथवा भाजीची ग्रेव्ही तयार करण्यासाठी वापरू शकता. कारण त्यामध्ये भाज्यांमधील पोषक तत्वं असतात.