मुंबई : सध्या संपूर्ण देशभरात डेंग्यू थैमान घातलाना दिसत आहे. डेंग्यूचा फैलाव सगळीकडै मोठ्या प्रमाणात पसरताना दिसत आहे. दिल्ली, नोएडासह अनेक वेगवेगळ्या राज्यांमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये डेंग्यूचा डासांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी वेगवेगळे उपाय करणं खूप गरजेचं असतं. त्यात बहुतेक लोक डेंग्यूपासून वाचण्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतात. पण काही वेळा त्याचा काहीही फरक दिसत नाही. खाली दिलेल्या घरगुती उपायांचा वापर करून डासांना लावा पळवून.
लवंग-लिंबू – तुमच्या घरातील डास दूर करण्यासाठी तुम्ही लवंग आणि लिंबूचा वापर करू शकता. यासाठी लिंबूचे दोन तुकडे करा आणि त्यामध्ये काही लवंग टाका. लिंबाचे हे तुकडे तुमच्या घराच्या कोपऱ्यांमध्ये ठेवा यामुळे तुमच्या घरातील डास पळून जाण्यास मदत होईल.
कापूर-कडुलिंबाचे तेल – कापूर आणि कडुलिंबाच्या तेलाच्या मदतीने तुम्ही तुमच्या घरातील डास घालवू शकता. डासांना कापूर आणि कडुलिंबाच्या तेलाचा वास आवडत नाही त्यामुळे ते घरामधून निघून जातात. तर यासाठी कापूर आणि कडुलिंबाचे तेल एकत्र करा आणि ते तुमच्या घरात गरम करून खोली बंद करा. यामुळे त्याचा वास संपूर्ण घरात पसरेल आणि घरातील डास निघून जातील किंवा मरून जातील.
लसूण- घरातील डास पळवण्यासाठी तुम्ही लसणाचा वापर करू शकता. त्यासाठी गरम पाणी उकळून घ्या आणि त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाका. हे तयार झालेले पाणी एका स्प्रे बाटलीमध्ये टाका आणि ते तुमच्या घरातील कोपऱ्यांमध्ये मारा. यामुळे घरातील डास मरून जातील.