Health News : सध्याच्या काळात बदलती जीवनशैली, वाढते प्रदूषण, एखाद्या गोष्टीचं सारखं टेन्शन घेणे या गोष्टींमुळे डोकेदुखीचा त्रास भरपूर जणांना होतो. काहीजण या डोकेदुखीकडे दुर्लक्ष करतात. अशा लोकांनी या डोकेदुखीला साधा आजार समजू नये. कारण हे माइग्रेनचं लक्षण असू शकतं. तर जे लोक माइग्रेनचा सामना करत असतील अशा लोकांना माइग्रेनवर मात करण्यासाठी आम्ही काही घरगुती उपाय आहेत.
जर डोक्याला एकाच ठिकाणी सतत दुखत असेल तर त्याला माइग्रेन असे म्हणतात. हा त्रास एवढा होतो की लोकांना यापासून आराम मिळण्यासाठी औषधं घ्यावी लागतात. पण तुम्हाला माहिती आहे का की अॅलोपॅथी औषधांव्यतिरिक्त माइग्रेनवर घरगुती उपायांनीही मात करता येते.
इंस्टाग्रामवर एक वैद्य मिहीर खत्री नावाचे डॉक्टर आहेत. हे डॉक्टर अनेकदा आयुर्वेदिक पद्धतीचे उपचार सांगत असतात. त्यांनी एका व्हिडिओमध्ये डोकेदुखी लगेच दूर करण्यासाठी उपाय सांगितला आहे. तसेच या घरगुती उपायामुळे ते 2 ते 12 आठवड्यांत मायग्रेनही दूर करू होते. डॉ. खत्री यांनी सांगितलं की तुम्हाला कोथिंबीरशी संबंधित उपाय अवलंबावा लागेल.
यासाठी तुम्हाला सर्वात आधी कोथिंबीर बारीक वाटून ती दुधात किंवा पाण्यात गरम करून घ्यावी लागेल. हे मिश्रण उकळी येईपर्यंत गरम करावे लागते. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही त्यात रॉक शुगरही टाकू शकता, पण जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास असेल तर शुगर घालू नका.
हे पेय बनवून झाल्यानंतर ते रात्री झोपण्यापूर्वी प्यावे आणि त्यानंतर काहीही खाऊ नये. हे करताना तुम्हाला थोडा धीर धरावा लागेल कारण हा उपाय गुणकारी ठरण्यासाठी 2 ते 12 आठवडे लागू शकतात. तसेच जर तुम्हाला दररोज डोकेदुखीचा त्रास होत असेल तर तुम्ही कोथिंबीरीची पेस्ट बनवून कपाळावर लावू शकतो. त्यामुळे तुमचं डोकं राहण्यास मदत होईल आणि डोक्याला थंडावा मिळेल.
जर तुम्हाला वारंवार माइग्रेन होत असेल तर आतापासून योगासने सुरू करा. योगासन केल्यामुळे माइग्रेनवर मात करण्यास मदत होते. पण जर तुम्हाला दररोज योगासन करायला जमत नसेल तर रोज काही मिनिटे ध्यान करा.
तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार, शरीरात पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी किंवा माइग्रेन होऊ शकतो. त्यामुळे दिवसातून एकदा हिरव्या भाज्या खा. आणि दिवसातून किमान 8 ग्लास पाणी प्यावे. कारण शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे एक नाही तर अनेक आरोग्यविषयक समस्या उद्भवतात.