मुंबई : चेन्नई येथील एका कंपनीच्या आय ड्रॉपवर बंदी घालण्यात आली आहे. या कंपनीने हे औषध बाजारातून मागे घेतले आहे. ग्लोबल फार्मा हेल्थकेअर कंपनीच्या या आय ड्ऱॉपला अमेरीकन अन्न आणि औषध प्रशासनाच्या सूचनेवरून अमेरिकन मार्केटमधून मागे घेण्यात आले आहे. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या सूचनेनंतर हे कठोर पाऊल उचलण्यात आले आहे. अमेरीकेची सेंटर फॉर डीसीज कंट्रोल एण्ड प्रिव्हेंस (सीडीसी ) या औषधाची अधिक तपासणी करीत आहे. तर अमेरीकन अन्न आणि औषध प्रशासनाने या आय ड्रॉपच्या आयातीवरच बंदी घातली आहे.
अमेरीकन अन्न आणि औषध प्रशासनाने सूचना जारी करताना एझरीकेयर आय ड्रॉपचे थेंब डोळ्यात टाकल्याने यातील औषध-प्रतिरोधक बॅक्टेरियामुळे डोळ्यांना संसर्ग होऊन अंधत्व येऊ शकते असे म्हटले आहे. या औषध-प्रतिरोधक बॅक्टेरियामुळे कायमस्वरूपी दृष्टी कमी होऊ शकते असे म्हटले आहे. तसेच यामुळे रक्तप्रवाहाच्या संसर्गाने एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
चेन्नईच्या ग्लोबल हेल्थ फार्मा हेल्थकेअर कंपनीने हे औषध बाजारातून मागे घेतले आहे. ग्लोबल फार्मा हेल्थकेअर कंपनीने तिच्या वेबसाईटवर ही माहिती दिली आहे. आम्ही प्रोडक्टचे डिस्ट्रीब्यूटर अरु फार्मा इंक/एझरीकेयर आणि डेलसम फार्मा यांना या औषधाच्या कन्साईनमेंट मागे घेण्यास सांगितले आहे. या औषधाचा वापर कोणी करू नये असे सूचित करण्यात आले आहे. अमेरीकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने हे आदेश जारी केले.
CDSCO suspends manufacturing of eye drops linked to 55 adverse events in United States
Read @ANI Story | https://t.co/mHjlHXnXGb#CDSCO #eyedrops #USA #FDA pic.twitter.com/XBBeJXcaWD
— ANI Digital (@ani_digital) February 4, 2023
अमेरीकन अन्न आणि औषध प्रशासनाने सावध करीत म्हटले आहे की या आय ड्रॉपच्या वापराने अंधत्व येऊ शकते. मृत्यू देखील होऊ शकतो जे लोक या औषधाचा वापर करीत आहेत त्यांनी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा अशा सूचना युएस एफडीएने केल्या आहेत.
अमेरीकेची सेंटर फॉर डीसीज कंट्रोल एण्ड प्रिव्हेंस (सीडीसी ) या औषधाची अधिक तपासणी करीत असल्याचे म्हटले आहे. तर अमेरीकन अन्न आणि औषध प्रशासनाने या आय ड्रॉपच्या आयातीवरच बंदी घातली आहे. अमेरीकेतील डॉक्टरांनी स्यूडोमोनास एरुगिनोसा (Pseudomonas Aeruginosa) बाबत सावधान केले आहे, या औषधाने अमेरीकेच्या अनेक राज्यांमध्ये किमान 55 लोकांना संसर्ग झाला आहे,तर एकाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत, 11 पैकी किमान पाच रुग्णांच्या डोळ्यांना थेट संसर्ग झाला असून त्यांची दृष्टी गेली आहे.