लग्न झालेल्यांच्या तुलनेत ‘अविवाहीत’ लोकांचा ‘या’ गंभीर आजारामुळे मृत्यू होण्याची शक्यता अधिक; तुम्हीही द्या लक्ष !

| Updated on: Jul 09, 2022 | 10:25 AM

लग्न झालेल्या लोकांच्या तुलनेत सिंगल लोकांचा पोटाच्या कॅन्सरमुळे मृत्यू होण्याची शक्यता अधिक असते, अशी माहिती एका अभ्यासातून समोर आली आहे. तसेच विवाहीत लोकांची कॅन्सरमधून वाचण्याची शक्यता खूप जास्त असते, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.

लग्न झालेल्यांच्या तुलनेत अविवाहीत लोकांचा या गंभीर आजारामुळे मृत्यू होण्याची शक्यता अधिक; तुम्हीही द्या लक्ष !
लग्न झालेल्यांच्या तुलनेत 'अविवाहीत' लोकांचा 'या' गंभीर आजारामुळे मृत्यू होण्याची शक्यता अधिक; तुम्हीही द्या लक्ष !
Image Credit source: twitter
Follow us on

अविवाहीत राहिल्यामुळे, लग्न न केल्यामुळे कॅन्सर ( Cancer)होण्याचा धोका वाढू शकतो का ? लग्न झाल्यामुळे (Being Married) कॅन्सर बरा होण्याची शक्यता वाढते का ? तर त्याचे उत्तर आहे हो ! गेल्या अनेक अभ्यासांतून हा निष्कर्ष समोर आला आहे की, लग्न झाल्यामुळे, वेळेआधीच होणाऱ्या मृत्यूचा धोका कमी होऊ शकते. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, लग्न झालेल्या लोकांमध्ये सर्व्हायवल रेट ( survival rate) अधिक असतो. त्यानंतर येतात सिंगल लोक आणि काही कारणामुळे आपल्या जोडीदारापासून वेगळे झालेल्यांचा नंबर यात ( सर्व्हायवल रेट ) शेवटी लागतो. SWNS ने दिलेल्या माहितीनुसार, ॲनह्युई मेडिकल युनिव्हर्सिटीतील कॉरस्पॉंडिंग ऑथर प्रोफेसर ॲमन ह्यू यांच्या सांगण्यानुसार, ‘विवाहीत लोक हे आर्थिकदृष्ट्या स्टेबल असतात. त्यांना (जोडीदाराकडून) मानसिक आधारही मिळतो. ‘

संपूर्ण जगात, कॅन्सरमुळे मृत्यू होणाऱ्यांमध्ये पोटाचा कॅन्सर हे तिसऱ्या क्रमांकाचे प्रमुख कारण आहे. अमेरिकेत कॅन्सरमुळे दरवर्षी 11 हजार नागरिकांचा मृत्यू होतात.

कॅन्सर शरीरातील इतर भागांत पसरलेला नाही, अमेरिकेतील अशा 3,647 केसेसचा प्रोफेसर ह्यू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अभ्यास केला. या सर्व पेशंट्सचे निदान 2010 ते 2015 या कालावधीत झाले होते.

हे सुद्धा वाचा

लग्न झालेल्या लोकांची वाचण्याची शक्यता 72 % इतकी होती. पतीच्या तुलनेत पत्नीची, जिवंत राहण्याची शक्यता अधिक (76 %) होती, असेही या संशोधनातून समोर आले. तर ज्या पुरुषांच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे, त्यांचा जीव वाचण्याची शक्यता खूप कमी (51%) होती.

पोटाचा कॅन्सर म्हणजे काय ?

आपण जे अन्न खातो, ते सरळ आपल्या पोटात जाते. तेथे अन्नपचनाची क्रिया सुरू होते. पोटातील आतल्या भागात कॅन्सरच्या पेशी तयार होण्यास सुरूवात होऊ, त्यांचा ट्युमर विकसित होते. यालाच गॅस्ट्रिक कॅन्सर असेही म्हटले जाते. पोटाचा कॅन्सर हा अनेक वर्षे हळूहळू वाढत असतो. तो शरीराच्या इतर भागांतही पसरू शकतो.

ही आहेत पोटाच्या कॅन्सरची लक्षणं :

– अन्न गिळण्यास त्रास होणे .
– जेवणानंतर पोटात रक्तस्त्राव झाल्यासारखे वाटणे.
– थोडेसेच खाऊनही पोट भरल्यासारखे वाटणे.
– जळजळ, अपचन, पोटात दुखणे.
– काही कारण नसतानाही वजन कमी होणे.

पोटाचा कॅन्सर होण्याची कारणे :

गॅस्ट्रोएसोफेगल रिफ्लेक्स डिसीज (GERD), यामध्ये पोटात तयार होणारे ॲसिड पुन्हा फूड पाइपमध्ये जमा होण्यास सुरूवात होते. जाडेपणा, जेवणात मीठ आणि तिखटाचा जास्त वापर, जेवणात हिरव्या भाज्या आणि ड्रायफ्रुट्सचा समावेश न करणे, पोटात बराच काळ जळजळ होत राहणे, स्मोकिंग अशी अनेक कारणे पोटाच्या कॅन्सरचा धोका वाढवू शकतात.