Health : डॉक्टर प्रत्येकाला कडधान्य खाण्याचा सल्ला देतातच. कारण कडधान्यांमध्ये अनेक पोषक घटक आणि प्रोटीन असते जे शरीराला गरजेचं असतं. यामध्ये मग चवळी, मटकी, काळे हरभरे, मूग अशा अनेक प्रकारचे कडधान्य खाण्याचा सल्ला डॉक्टर देतातच. यामध्ये काळे हरभरे हे शरीराठी खूप लाभदायक असतात. तर आज आपण या काळ्या हरभऱ्यांचा आपल्या शरीराला नेमका कसा फायदा होतो याबाबत जाणून घेणार आहोत.
काळ्या हरभऱ्यांमध्ये अनेक पोषक घटक आढळतात. विशेष म्हणजे इतर कडधान्यांपेक्षा काळ्या हरभऱ्यांमध्ये प्रथिनांचे प्रमाण खूप जास्त असते. तसंच ते आहारातील फायबरचाही मोठा स्त्रोत आहे. तर आता आपण उकडलेल्या काळ्या हरभऱ्यांमध्ये कोणते पोषक घटक आढळतात याबाबत जाणून घेणार आहोत.
1. पचनक्रिया सुरळीत होते
उकडलेल्या काळ्या हरभऱ्यांमध्ये भरपूर फायबर असते. ज्यामुळे पचनाची समस्या निर्माण होत नाही. तसंच हे कडधान्य गॅस, बद्धकोष्ठता आणि पोटाच्या अनेक समस्यांना दूर करण्याचे काम करते.
2. शरीराला एनर्जी मिळते
अनेकवेळा तज्ञ काळे हरभरे खाण्याचा सल्ला देतात. कारण यामुळे शरीराला मोठ्या प्रमाणात एनर्जी मिळते. तसंच उकडलेले काळे हरभरे खाल्ल्यामुळे शरीराला दिवसभर ऊर्जा मिळते.
3. वजन नियंत्रणात राहते
उकडलेले काळे हरभरे खाल्ल्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. कारण तुम्ही जर सकाळी एकदा हे हरभरे खाल्ले तर तुम्हाला दिवसभर भूक लागत नाही त्यामुळे तुम्ही जास्त काही खातही नाही. काही दिवस तुम्ही असं जर केलं तर तुमचं वजन न वाढता नियंत्रणात राहते.