भारतीय पदार्थांमध्ये अनेक मसाल्यांचा वापर केला जातो. मसाल्यांमुळे पदार्थांची चव वाढते. त्यासोबतच मसाल्यांमुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. मसाल्यांचे नियमित सेवन केल्यामुळे तुमचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. मसाल्यांमधील जिऱ्याचा वापर वापर केला जातो. कोणत्याही पदार्थांमध्ये जिऱ्याची पावडर वापरल्यामुळे डाळीमध्ये आणि भाज्यांमध्ये जिऱ्याच्या पावडरचा वापर केला जातो. गरम मसाला बनवण्यासाठी देखील जिऱ्याचा वापर केला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का? जिरे फक्त तुमच्या जेवणाची चव वाढत नाही पण तुमच्या आरोग्याला देखील त्याचे अनेक फायदे होतात.
जिऱ्याचे सेवन केल्यास तुमच्या शरीराला अनेक फायदे होतात. जिऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह, तांबे, कार्बोहायड्रेट्स आणि व्हिटॅमिन सी यांच्या सारखे पोषक घटक असतात ज्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. जिऱ्याचा पदार्थांचा वापर केल्यामुळे तुमचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया जिऱ्याचे सेवन करण्याचे फायदे.
भाजलेल्या जिऱ्याचे सेवन केल्यामुळे तुमचं पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. जिऱ्यामध्ये भरपबूर प्रमाणात फायबर असते ज्यामुळे तुमच्या पोटाचे आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. फायबरमुळे तुम्हाला पोटदुखी सारख्या समस्या दूर होण्यास मदत होते. त्यासोबतच बद्धकोष्ठता, गॅस आणि पोट फुगणे यांच्या सारख्या समस्या देखील दूर होतात.
वजन नियंत्रित राहाते – आजकाल अनेक जंक फूडचे जास्त प्रमाणात सेवन करतात. जंक फूडचे सेवन केल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये भरपूर प्रमाणात चरबी जमा होते. जिऱ्याचे सेवन केल्यामुळे तुमच्या शरीरातील चयापचय वाढते ज्यामुळे शरीरातील कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. त्यासोबतच जास्त प्रमाणात भूक लागत नाही.
रोगप्रतिकारकशक्ती वाढते – जिऱ्यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटीमायक्रोबियल गुणधर्म भरपूर प्रमाणात आढळतात, ज्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते. जिरे नियमित खाल्ल्यामुळे सर्दी, खोकला आणि ताप यांच्यासारख्या आजारांपासून दूर होण्यास मदत होते.
मधुमेह कमी होतो – भाजलेले जिरे मधुमेहाच्या रुग्णांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. जिऱ्याचे सेवन केल्यामुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहाण्यास मदत होईल. जिऱ्याचे सेवन केल्यास तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिनची मात्रा वाढते ज्यामुळे ग्लुकोज योग्य प्रमाणात मिळते.
हृदय निरोगी राहाते – भाजलेले जिरे हृदयाच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. जिऱ्याचे सेवन केल्यास रक्तदाब कमी करण्यास आणि कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते, ज्यामुळे हृदयाशी संबंधित रोगांचा धोका कमी होतो.
गर्भवती महिला आणि स्तनपान देणाऱ्या महिलांनी भाजलेले जिरे खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. याशिवाय ज्यांना जिऱ्याची ऍलर्जी आहे त्यांनीही जिऱ्यााचे सेवन करणं टाळावे.