नवी दिल्ली – आजकाल बऱ्याच मुलांना बाहेरचे तेलकट पदार्थ, जंक फूड (junk food) खायची सवय लागली आहे. मात्र या पदार्थांच्या सेवनाने शरीरात फायबरसारखी (fiber) पोषक तत्वं कमी होतात आणि मुलांना बद्धकोष्ठतेचा (constipation) त्रास होतो. बाहेर गेल्यावरच नव्हे काही मुलं तर घरातही असे चटकमटक, चविष्ट पदार्थ खायचा हट्ट करतात. त्यांची चव तर उत्तम असते, पण त्यामध्ये पोषणमूल्य नगण्य असतात. रोजच्या नाश्त्यात ब्रेडयुक्त पदार्थांचे सेवन केल्यास पोट बिघडते. मैदा हा आजकाल सर्व पदार्थांमध्ये असतोच, मात्र त्याचे सेवन हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरत नाही, त्याचे मोठे दुष्परिणाम होतात.
लहान मुलांना बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर त्यांचे पोट नीट साफ होत नाही आणि ही स्थिती गंभीर झाल्यास डॉक्टरांकडे जायची वेळ येते. काही आयुर्वेदिक उपचारांच्या मदतीने हा त्रास दूर करता येऊ शकतो.
त्रिफळा
अनेक औषधी वनस्पतींपासून बनवलेली त्रिफळा ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे, ज्यामुळे अवघ्या काही मिनिटांतच बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होऊ शकतो. मुलांना हे औषध देऊ शकता. यामध्ये अनेक अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्म आणि अँटी-ऑक्सीडेंट्स असतात, ज्यामुळे पोटाचे आरोग्य चांगले राहते.
दूध आणि तूप
दुधामध्ये अनेक पोषक तत्वं असतात आणि घरी बनवलेले शुद्ध तूप हेही आपल्या पोटासाठी व आरोग्यासाठी चांगले समजले जाते. बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर एक कप कोमट दुधात दोन चमचे तूप घालून ते मुलांना प्यायला द्यावे. यामुळे बद्धकोष्ठता लगेच दूर होते. तुपाला आयुर्वेदात खूप महत्व आहे, ज्यामुळे बद्धकोष्ठतेसह शरीराच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात.
अंजीर
केवळ मोठी माणसंच नव्हे तर लहान मुलांनीहा अंजीर खावा असा सल्ला दिला जातो. अंजीरमध्ये पोटासाठी आवश्यक असलेल्या फायबरचे प्रमाण सर्वात जास्त असते. दुपारी जेवताना किंवा अधे-मध्ये छोटी भूक लागते तेव्हाही लहान मुले अंजीर खाऊ शकतात. मात्र तो खाण्यापूर्वी काही वेळ आधी भिजवून ठेवावा. अंजीरामध्ये काही अशी तत्व असतात ज्यामुळे आपले शरीर उर्जावान राहते.
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)