Health : पावसाळ्यामध्ये ‘हे’ चहा एकदा प्याच, सर्दी-कणकणीपासून मिळणार सुटका

| Updated on: Jul 11, 2023 | 5:46 PM

Best Tea For Rainy Days : बदलत्या हवामानामुळे अनेकदा कणकणी जाणवते यावर लगेच काही डॉक्टरांकडे जात नाहीत. मात्र काही चहा हे आपल्यासाठी आरोग्यदायी आहेत.

Health : पावसाळ्यामध्ये हे चहा एकदा प्याच, सर्दी-कणकणीपासून मिळणार सुटका
Follow us on

मुंबई : चहा म्हणजे काहींसाठी एखाद्या टॉनिकसारखा असतो. आता पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत त्यामुळे चहाचा आस्वाद घेतला जातोच. आजकाल तुम्ही जाल तिथे तुम्हाला चहाप्रेमी दिसतीलच. एकवेळ काहीजण जेवायचं विसरेल पण चहा घेतल्याशिवाय राहणार नाही.  त्यात आता चहाचे अनेक वेगवेगळे प्रकारही पाहायला मिळतात. अनेकदा चहाने तरतरी येते आणि कामात आलेला कंटाळाही जातो. पावसाळ्यात चहा पिणे हे खूप फायदेशीर ठरते, बदलत्या हवामानामुळे अनेकदा कणकणी जाणवते यावर लगेच काही डॉक्टरांकडे जात नाहीत. मात्र काही चहा हे आपल्यासाठी आरोग्यदायी आहेत.

तुळशीचा चहा – तुळशीची पाने ही आरोग्यदायी असतात. त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे तुळशीच्या पानांपासून बनवलेला चहा हा शरीरासाठी गुणकारी असतो. हा चहा पिल्याने सर्दी, खोकला, डोकेदुखी या आजारांपासून आराम मिळतो. तसेच हा चहा पिल्याने रोगप्रतिकारक शक्तीही वाढते आणि त्याचा आपल्या त्वचेलाही फायदा होतो.

ग्रीन टी – ग्रीन टी देखील आरोग्यास फायदेशीर असते. जे लोक त्यांचं वजन नियंत्रणात आणू इच्छितात अशा लोकांनी ग्रीन टी आवर्जून पिली पाहीजे. तसेच या चहामध्ये अँटिऑक्सिडंट असतात जे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती स्ट्रॉंग राहील्यामुळे आजारही होत नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात ग्रीन टी आवर्जून प्या.

आल्याचा चहा – बहुतेक लोकांना आल्याचा चहा प्यायला आवडतो. आल्याचा चहा हा टेस्टी देखील असतो. हा चहा जितका टेस्टी असतो तितकाच हेल्थी देखील असतो. आल्याचा चहा पिल्यामुळे आपला घसा साफ होतो, सर्दीसाठी देखील हा चहा चांगला असतो. तसेच पोटाशी संबंधित समस्याही या चहाचं सेवन केल्याने कमी होतात. त्यामुळे पावसाळ्यात आल्याचा चहा पिणे खूप फायदेशीर ठरते.