मुंबई : स्वातंत्र्यदिनी (Independence Day News) मोठी खूशखबरी समोर आली आहे. कोरोनाशी दोन हात लढताना आता भारताला अधिक बळ मिळणार आहे. कारण भारत बायोटेकनं (Bharat Biotech) कोरोनाच्या बीबीव्ही-154 इंट्रानेझल वॅक्सीनच्या (BBV154 intranasal covid vaccine) क्लिनिकल ट्रायलाचा तिसरा टप्पा पूर्ण केला आहे. आता या वॅक्सीनला बूस्टर डोस म्हणूनही दिलं जाऊ शकेल, असं जाणकारांनी म्हटलं आहे. स्वातंत्र्यदिनी मिळालेली ही मोठी उपलब्धी असल्याचा विश्वास व्यक्त केला जातोय. भारत बायोटेकच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरुन याबाबतची माहिती देण्यात आली आहे. बीबीव्बी-154 इन्ट्रानेझल वॅक्सीनचा पहिला आणि दुसरा क्लिनिकल ट्रायलचा टप्पा याआधीच झाला होता. या ट्रायलच्या दरम्यान, पहिल्या आणि दुसऱ्या डोसची चाचणी करण्यात आली आहे. या चाचणीला यश आल्यानंतर बुस्टर डोस म्हणून तिसऱ्या डोलचं परीक्षण करण्यात आलं होतं. अर्थात आतापर्यंत बुस्टर डोस त्यांना देण्यात आली आहे, त्यांनी कोरोनाच्या दोन्ही लसींचे डोस पूर्ण केलेले आहेत.
Bharat Biotech completes clinical development for phase III trials and booster doses for BBV154 intranasal covid vaccine.#BharatBiotech #covid19vaccine #bbv154 #intranasalvaccine #covid19 pic.twitter.com/oh76drnezz
हे सुद्धा वाचा— BharatBiotech (@BharatBiotech) August 15, 2022
आता तिसऱ्या टप्प्यामध्ये नॅशनल रेग्युलेटरी ऑथोरीटीकडे ट्रायलमध्ये समोर आलेले आकडे पाठवण्यात आले आहेत. पहिल्या डोसनंतर वेगवेगळ्या अनुशंगाने चाचण्या करण्यात आल्या होत्या. सुरक्षेच्या आणि रोगप्रतिकारक क्षमतेच्या दृष्टीने प्रत्येक पैलू अभ्यासला गेला होता. त्यानंतर या लसीची तुलना कोवॅक्सिनशी करण्यात आली होती. दरम्यान, भारत बायोटेकने 14 ठिकाणी परीक्षण केलं होतं.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार क्लिनिकल ट्रायलमध्ये काही जणांना लसीचा डोस परीक्षणासाठी देण्यात आला होता. या सर्वांना सकारात्मक प्रतिसाद दिसून आला असून आतापर्यंत कोणत्याही गंभीर परिणामांची नोंद करण्यात आलेली नाही. साईड इफेक्टचा कोणताही धोका नसल्याचं परीक्षणात आढळून आलं आहे. समोर आलेल्या क्लिनिकल चाचणीमध्ये ही इन्ट्रानेझल लस सुरक्षित, रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारी आणि योग्य प्रकारे शरीरात काम करत असल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे. या इन्ट्रानेजल डोसचं 9 जागी परीक्षण करण्यात आलं होतं, अशी माहिती भारत बायोटेकने दिली.
केंद्र सरकाराने गेल्या वर्षी मिशन कोविड सुरक्षा मोहीम राबवण्यात सुरुवात केली होती. या मोहिमेच्या अंतर्गत वेगानं काम करत लसीकरणाचं ध्येय गाठण्यासाठी उपक्रम सुरु केला होता. या मिशनमध्ये एक सुरक्षित, प्रभावी, स्वस्त आणि सुलभ अशी कोविड लस उपलब्ध करुन देण्याबाबत विशेष काम करण्यात आलं होतं. दरम्यान, आता भारत बायोटेकने केलेल्या तिसऱ्या क्लिनिकल ट्रायलच्या यशस्वी परीक्षणामुळे भारताला लसवंत होण्याच्या मोहिमेमध्ये अधिक बळकटी येईल, असा विश्वास व्यक्त केला जातोय.