प्रातिनिधिक छायाचित्र
Image Credit source: tv9
शरीरातील हार्मान्सचे (Hormonal imbalance) संतुलन बिघडले असेल तर त्यामुळे आरोग्याशी निगडीत अनेक समस्या उद्भवू शकतात. हार्मोन्स आपल्या शरीरासाठी (Good for health) खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे शरीराला केवळ उर्जाच मिळत नाही, तर त्यामुळे शरीराची वाढ होते आणि मेटाबॉलिझमही नीट राहते. जर हेच हार्मोन्स असंतुलित झाले तर शरीरात वेदना, थकवा, झोप येण्यात अडचण, त्वचेच्या समस्या, लठ्ठपणा, वजन कमी होणे, अनियमित मासिक पाळी, असे अनेक त्रास होऊ शकतात. हे असंतुलित हार्मोन्स नीट करण्यासाठी तब्येत नीट ठेवमे महत्त्व चे आहे. भुजंगासन (Bhujangasan) केल्याने तुम्हाला यामध्ये मदत मिळू शकते. हे योगासन केल्याने हार्मोन्स संतुलित राहतात. भुजंगासन कसे करतात व त्याचे फायदे काय आहेत, ते जाणून घेऊ या…
भुजंगासनाचे फायदे –
असंतुलित हार्मोन्स नीट करण्यासाठी भुजंगासन फायदेशीर ठरते. या आसनाला कोब्रा पोझ असेही म्हणतात. मागच्या बाजूला वाकून हे आसन केले आहे. हे आसन केल्याने आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात.
- – स्टाइलक्रेज नुसार, या आसनामुळे असंतुलित हार्मोन्सचा त्रास दूर होते.
- – या योगासनामुळे स्नायू मजबूत होतात.
- – भुजंगासन केल्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते.
- – पाठीच्या दुखण्यापासून आराम मिळतो.
- – मासिक पाळीशी संबंधित समस्या दूर होतात.
कसे करावे भुजंगासन?
- – जमिनीवर चटई किंवा मॅट अंथरावी आणि पोटावर झोपावे.
- – आपल्या हाताचे तळवे खांद्याखाली ठेवावे.
- – पाय सरळ जोडलेले असावेत.
- – खांदे सरळ करत हातांवर भार टाकत शरीराचा वरचा भाग हातावर उचलावा.
- – हळू-हळू शरीर खाली आणत तसेच रोखून ठेवावे.
अन्य योगासनेही ठरतात फायदेशीर –
- – असंतुलित हार्मोन्सवर उपचार करण्यासाठी उष्ट्रासन म्हणजेच उंट पोझ, ससंगासन, रेझिस्टन्स अँड वेट्स, हाय इंटेन्सिटी इंटर्व्हल ट्रेनिंग, वॉकिंग, शलभासन इत्यादी
- गोष्टीही फायदेशीर ठरू शकतात.
- – Bodywise.com नुसार, सेतू बंध सर्वांगसनानेदेखील असंतुलित हार्मोन्स बरे केले जाऊ शकतात. यामुळे थायरॉइड सुधारते.
- – बद्ध कोणासन केल्याने पीसीओडीच्या समस्येपासून आराम मिळतो.
- – मलासन स्नायू टोनिंगसह हार्मोन्स संतुलित ठेवण्यास मदत करते.