Benefits of Biotin: कमकुवत नखं, गळणारे, तुटणारे केस आणि त्वचेच्या ( Nail problems, Hair fall, skin problmes) अनेक समस्या आजकाल लोकांना सहन कराव्या लागतात. तुम्हीही या समस्यांमुळे त्रस्त असाल तर बायोटीनचे (Biotin) सेवन करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. बायोटीनच्या सेवनामुळे तुमची त्वचा निरोगी तर होईलच पण त्यावर छान ग्लोही ( Glow on Skin) येईल. त्याशिवाय नख आणि केसही मजबूत होतात. नखं तुटण्याची वा पिवळी पडण्याची समस्या कमी होते. केसांनाही बायोटीनमुळे खूप फायदा होतो. केसगळती कमी होते (Cures Hair fall), त्यांचे तुटण्याचे प्रमाणही घटते. पण बायोटीनचे सेवन शरीरासाठी फायदेशीर असते का ? त्याचे इतर काही दुष्परिणाम ( are there any side effects of Biotin) तर होत नाहीत ना, असे प्रश्न तुम्हाला पडले असतील. तर बायोटीनबद्दलची माहिती विस्ताराने जाणून घेऊया.
हेल्थ लाइनने दिलेल्या माहितीनुसार, बायोटीनमुळे शरीराला खूप फायदे ( Benefits of Biotin)होतात. व्हिटॅमिन एच (Vitamin H)यालाच बायोटिन असे म्हटले जाते. शरीरात व्हिटॅमिन एच ची कमतरता जाणवू लागल्यास नखं कमकुवत होतात आणि केसगळतीही सुरू होते. त्याशिवाय त्वचेवरही अनेक लक्षणे (Skin problems) दिसू लागतात. व्हिटॅमिन एच च्या कमतरतेमुळे त्वचेवर लाल रंगाचे रॅशेस दिसू लागतात. तुम्हाला जर यापैकी कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागत असेल तर बायोटीनच्या सप्लीमेंट्सचे सेवन करू शकता. त्यामुळे नखं, त्वचा आणि केसांना खूप फायदे होतात. काही खाद्यपदार्थांद्वारे, नैसर्गिकरित्याही तुम्ही बायोटीनचे सेवन करू शकता.
आपल्या रोजच्या आहारातील काही खाद्यपदार्थांमध्येही व्हिटॅमिन एच (Vitamin H) म्हणजेच बायोटीन उपलब्ध असते. त्यांचे सेवन केल्यास शरीरातील व्हिटॅमिन एच अथवा बायोटीनची कमतरता पूर्ण होते. अंडी, मांस, काजू, बदाम, अक्रोड यांसारखी ड्रायफ्रुट्स आणि सोयाबीन या पदार्थांमध्ये बायोटीन मुबलक प्रमाणात असते. त्याशिवाय केळी, मशरूम, कोबी यांच्यामध्येही बायोटिन असते. या पदार्थांचे सेवन केले तर शरीराला बायोटीन नैसर्गिकरित्या, सहज मिळते. मात्र हे पदार्थ खाल्ले जात नसतील तर बायोटीनच्या सप्लीमेंट्स खाव्या लागतात. मधुमेह (Diabetes)कमी होण्यासाठी बायोटीनचे सेवन करणे फायदेशीर ठरते.