चुकीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाचं आयुष्य बदललं आहे. त्याचा आपल्या आरोग्यावर थेट परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या कारणामुळे आपल्यामागे दवाखानाही लागला आहे. वेळेवर जेवण केलं नाही किंवा पोषणतत्त्वांनी भरलेला आहार घेतला नाही तर कमजोरी येते, तसेच गॅस्ट्रिकसारख्या समस्याही निर्माण होऊ शकतात. चुकीच्या दिनचर्येचा आरोग्यावर प्रभाव पडल्यामुळे सुरुवातीला मनुष्य थकलेला आणि कमकुवत वाटतो. यामुळे शरीराची शक्ती कमी होऊ लागते आणि भविष्यात काही रोगांमध्ये वाढ होऊ शकते. जर तुम्ही काम केल्यानंतर किंवा चालल्यानंतर थकल्याचे जाणवत असेल, तर तुमच्या दिनचर्येत काही बदल करणे आवश्यक आहे.
थोडे काम केल्यानंतर किंवा शरीरात शक्तीची कमतरता जाणवली म्हणजे शरीर आतमध्ये कमकुवत झाले आहे, हे समजून जा. तुम्ही नाश्ता केला नसेल तर तुम्हाला दुपारपर्यंत ऊर्जा मिळणार नाही. त्यामुळे शरीर निरोगी ठेवायचं असेल आणि शरीरात ऊर्जा निर्माण करायची असेल तर तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या काही गोष्टी करणं भाग आहे. त्या गोष्टी केल्या तरच तुमची जीवनशैली बदलेल.
7 ते 8 तास झोपल्यानंतर सकाळी शरीर हायड्रेट करणे आवश्यक आहे. त्यासाठी सकाळी एक ग्लास कोमट पाणी पिणे आवश्यक आहे. यामुळे शरीरातून विषारी पदार्थ बाहेर जातात. दररोज योगासना करण्याचा सल्लाही दिला जातो. योगासने करून थोडेथोडे पाणी प्या. जेवढं अधिक पाणी प्याल तेवढं शरीर चांगलं राहील.
सकाळी उठल्यावर दोन ते तीन बदाम खा. ब्राझील नट्स, पाइन नट्स, 7 ते 8 बदाम खाऊ शकता. यामुळे तुम्हाला प्रथिने मिळतील. त्यामुळे शरीराची ऊर्जा वाढेल. याशिवाय, या बदामांमध्ये चांगले फॅट्स असतात, जे हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवतात.
शरीरात दिवसभर एनर्जी ठेवायची असेल ततर रोज योगासने किंवा व्यायाम करणं आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही दिवसभर ऊर्जावान राहाल. तुम्ही सकाळी चालायला जा. मॉर्निंग वॉकमुळे शरीर ताजंतवाणं होतं. जे लोक दिवसभर बसून काम करतात, त्यांना सकाळी चालायला, योगासना करायला, सायकल चालवायला किंवा हलका व्यायाम करायला हवा. यामुळे स्नायूंना बळ मिळते आणि लवकर थकवा येत नाही.
सकाळी नाश्ता केल्यामुळे दुपारी जेवणापर्यंत ऊर्जा मिळते, त्यामुळे यामध्ये आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे. प्रथिने आणि फायबर्सयुक्त अन्न खाणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, बदाम, चिया सीड पुडिंग, ओट्स, मका, पनीर-चनेचा सॅलड, डाळ, केळी, दूध इत्यादी. सकाळी तेल आणि मसाल्याचे जास्त सेवन टाळावे.