नवी दिल्ली : सध्याच्या व्यस्त जीवनात सक्रिय राहणे कठीण आहे. बऱ्याच लोकांचे शेड्युल एवढे पॅक असते की त्यांना व्यायामासाठी (exercise) पुरेसा वेळ काढणे शक्य नसते. पण आपण केवळ 11 मिनिटे वेगाने चाललो किंवा ब्रिस्क वॉकिंग (brisk walk)केले तर त्यामुळे मृत्यूचा धोका कमी होऊ शकतो, हे तुम्हाला माहीत आहे का ? एका बातमीनुसार, चालण्याचा हा अद्भुत फायदा आहे. या संदर्भात पब्लिश झालेल्या अभ्यासामध्ये, एखाद्या व्यक्तीला आठवड्यातून किमान 150 मिनिटे मध्यम तीव्रतेच्या ॲक्टिव्हिटी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तज्ज्ञांच्या मते, असे केल्याने लवकर मृत्यू होण्याचा (dying early) धोका 25 टक्क्यांनी कमी होऊ शकतो.
त्याच वेळी, केंब्रिज युनिव्हर्सिटीला असे आढळून आले आहे की, जर तुम्ही त्यापेक्षा निम्मे म्हणजेच 75 मिनिटांपर्यंत व्यायाम केल्यास हृदयविकार, पक्षाघात आणि कॅन्सरचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो. संशोधनात, 30 दशलक्ष लोकांकडून डेटा गोळा करण्यात आला, जे एका आठवड्यात सायकलिंग, हायकिंग आणि नृत्य यासारख्या मध्यम तीव्रतेच्या 75 मिनिटांच्या ॲक्टिव्हिटी करतात आणि (त्यामध्ये) अकाली मृत्यूचा धोका 23 टक्क्यांनी कमी झाल्याचे आढळले. सोप्या भाषेत सांगायचे तर, मध्यम तीव्रतेने केलेला व्यायाम बहुतेक लोकांसाठी आरामदायक असतो आणि हृदयविकाराचा धोका सर्वात कमी असतो.
केंब्रिज विद्यापीठातील डॉ. सोरेन ब्रेझ यांच्या सांगण्यानुसार, प्रत्येत व्यक्तीने व्यायाम करणे किंवा सक्रिय राहणे आवश्यक आहे आणि काहीही न करण्यापेक्षा ही पद्धत अवलंबणे चांगले आहे. डॉ. सोरेन सांगतात की, जर तुम्ही आठवड्यातून 150 नाही तर 75 मिनिटे ब्रिस्क वॉकिंगची पद्धत अवलंबली तर अनेक आजार तुमच्यापासून दूर राहू शकतात. या अहवालात आठवडाभर एरोबिक्सचे रूटीन फॉलो करण्यावर अधिक भर देण्यात आला आहे.
या अभ्यासात असे आढळून आले की तीनपैकी दोन व्यक्तींनी दर आठवड्याला 150 मिनिटांपेक्षा कमी शारीरिक हालचाली केल्या, तर 10 पैकी फक्त 1 व्यक्तीने दर आठवड्याला 300 मिनिटांपेक्षा जास्त शारीरिक हालचाली केल्या. दर आठवड्याला 150 मिनिटांपेक्षा जास्त शारीरिक हालचाली केल्याने कोणताही आजार होण्याचा किंवा लवकर मृत्यूचा धोका कमी होऊ शकतो, असेही अभ्यासात दिसून आले.
तसेच या अभ्यासात असेही आढळून आले की दर आठवड्याला किमान 150 मिनिटे मध्यम तीव्रतेच्या शारीरिक हालचाली अथवा व्यायाम यामुळे सहा पैकी एक (मुदतपूर्व अथवा लवकर) मृत्यू टाळू शकतात. म्हणजेच शारीरिक हालचालींचा अथवा व्यायामाचा आपल्या चांगल्या आरोग्याशी थेट संबंध असतो. अशा परिस्थितीत, एखाद्या व्यक्तीने दर आठवड्याला किमान 150 मिनिटे व्यायाम करणे आवश्यक आहे.