‘या’ गोष्टी रोज खाल्ल्याने, तुमची हाडे होतील मजबूत; जाणून घ्या, हाडांच्या आरोग्यासाठी कोणते अन्नपदार्थ ठरू शकतात वरदान!

| Updated on: Jun 24, 2022 | 5:37 PM

वृद्धांसह तरुणांनाही आता हाडे दुखण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. कॅल्शियम हाडांसाठी खूप महत्वाचे मानले जाते. शरीरात कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होऊ लागतात. भविष्यात हाडे आणि सांधे दुखण्याच्या समस्येला सामोरे जावे लागू नये यासाठी अशा गोष्टींचा आहारात समावेश करणे महत्त्वाचे आहे.

‘या’ गोष्टी रोज खाल्ल्याने, तुमची हाडे होतील मजबूत; जाणून घ्या, हाडांच्या आरोग्यासाठी कोणते अन्नपदार्थ ठरू शकतात वरदान!
सांधे दुखण्याची समस्या
Image Credit source: tv9
Follow us on

अनेकांना चालताना किंवा बसताना हाडे आणि सांधे दुखण्याच्या समस्येला (Problems with joint pain) सामोरे जावे लागते. हे सूचित करते की, तुमची हाडे कमकुवत झाली आहेत. वृद्धांना सांधे आणि हाडे दुखत असल्याची तक्रार तुम्ही अनेकदा ऐकली असेल. वयानुसार हाडे कमकुवत होऊ लागतात. मात्र आता हाडांच्या दुखण्याची समस्या तरुणांमध्येही दिसून येत आहे. कारण धावपळीच्या जीवनात लोकांना त्यांच्या अन्नाची काळजी घेणे शक्य होत नाही. हाडांच्या मजबुतीसाठी कॅल्शियम अत्यंत महत्त्वाचे (Calcium is extremely important) मानले जाते. शरीरात कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे आणि सांधे दुखण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. त्यामुळे, तुमच्या आहारात अशा गोष्टींचा समावेश करणे महत्त्वाचे आहे जेणेकरून तुमची समस्या दूर होईल. जरी आजकाल बाजारात अनेक प्रकारचे सप्लिमेंट्स सहज उपलब्ध आहेत, परंतु सप्लिमेंट्सपेक्षा अशा गोष्टी खाणे चांगले असते, ज्यामुळे तुमची हाडे नैसर्गिकरित्या मजबूत (naturally strong)होतात.
या गोष्टींमुळे राहतील तुमची हाडे मजबुत

तीळ-

तिळात फॉस्फरस आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते, जे हाडांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते.

बीन्स-

बीन्स हाडांसाठी पॉवर हाऊस म्हणून काम करतात. त्यात मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि फॉस्फरस असतात, जे हाडांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. अशा परिस्थितीत राजमा, सोयाबीन यांसारख्या गोष्टींचा आहारात समावेश करणे महत्त्वाचे आहे.

हे सुद्धा वाचा

नाचणी-

नाचणीमध्ये कॅल्शियम देखील भरपूर असते, जे तुमच्या हाडांसाठी खूप चांगले मानले जाते. नाचणीच्या वापरातून तुम्ही चीला, पॅनकेक, रोटी इत्यादी बनवू शकता.

या गोष्टीही रोज खाव्यात

या तीन गोष्टींव्यतिरिक्त, रोजच्या आहारातील अशा काही गोष्टीं देखील आहेत, ज्याचे दररोज सेवन केल्याने तुम्हाला हाडे आणि सांधेदुखीच्या समस्येपासून आराम मिळेल.

अननस-

अननसात भरपूर पोटॅशियम असते, जे शरीरात तयार होणार्‍या ऍसिडची पातळी संतुलित करते आणि कॅल्शियमची कमतरता देखील टाळते. त्यात व्हिटॅमिन ए खूप जास्त प्रमाणात आढळते.

पालक –

पालकामध्ये कॅल्शियमचे प्रमाण खूप जास्त असते, जे हाडांसाठी आणि दातांसाठी फायदेशीर ठरते. रोज एक कप शिजवलेल्या पालकाचे सेवन केल्याने तुम्ही तुमच्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता २५ टक्क्यांपर्यंत पूर्ण करू शकता. याशिवाय पालकामध्ये लोह आणि व्हिटॅमिन ए जास्त प्रमाणात आढळते.

नट-

कॅल्शियम हाडांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. नट्समध्ये कॅल्शियम तसेच फॉस्फरस आणि मॅग्नेशियम असते. मॅग्नेशियम शरीराला कॅल्शियम शोषण्यास मदत करते.

केळी-

केळीला मॅग्नेशियमचा उत्तम स्रोत मानला जातो. हाडे आणि दातांच्या आरोग्यासाठी हे जीवनसत्व खूप महत्वाचे आहे. जर तुमची हाडेही कमकुवत होत असतील तर रोज एक केळी खा.

पपई-

100 ग्रॅम पपईमध्ये 20mg कॅल्शियम आढळते. पपई केवळ पचनासाठीच फायदेशीर नाही, तर हाडांसाठीही खूप फायदेशीर मानली जाते. त्यामुळे त्याचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. पण लक्षात ठेवा की, हे सर्व एकाच वेळी खाण्याऐवजी कमी प्रमाणात सेवन करा.