नवी दिल्ली : दरवर्षी चार मार्च हा जागतिक ओबेसिटी दिवस म्हणून पाळला जात असतो. जगात वाढत्या लठ्ठपणामुळे जगभरात जागरूकता पसरविण्यासाठी हा दिवस साजरा केला जात असतो. अशात वर्ल्ड ओबोसिटी फेडरेशनचा नवा अहवाल समोर आला आहे. त्यानुसार साल 2035 पर्यंत जगाची अर्धी लोकसंख्या या लठ्ठपणाच्या आजाराने ग्रस्त झालेली असेल. चला पाहूया आणखी काय म्हटले आहे या अहवालात.
साल पर्यंत जगाची अर्धी लोकसंख्या पिडीत…
वर्ल्ड ओबेसिटी अहवालात म्हटले आहे की साल 2025 पर्यत बरीच मोठी लोकसंख्या ओबेसिटीने लठ्ठपणाने बाधित असेल तर साल 2035 पर्यंत जगाची अर्धी लोकसंख्या लठ्ठपणाच्या आजाराने पीडीत झालेली असेल, 51 टक्के लोकांचे वजन त्यांच्या वयाच्या तुलनेत जास्त होण्याची शक्यता आहे. या अहवालात लहान मुलाच्या आणि टीनएजर मुलांनाही या आजाराचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढे या लोकांना हृदय विकाराचा आणि डायबिटीजचा देखील त्रास होऊ शकतो असे अहवालात म्हटले आहे.
युवा पिढीला होणार त्रास
या वर्ल्ड ओबेसिटी अहवालात म्हटले आहे की साल 2025 पर्यत युवा पिढीवर याचा खूप मोठा परिणाम झालेला जाणवेल. हा प्रभाव नंतर वाढत जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. व्यायामाचा अभाव आणि आहारात झालेला बदल आणि एकूणच बदलेली जीवन शैली यामुळे ही समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जगभरातील देशांनी आणि त्यांच्या सरकारी यंत्रणानी युवा पिढीच्या भवितव्यासाठी नविन धोरणे ठरविली पाहीजेत. तरूण पिढीला लठ्ठपणा पासून दूर राखण्यासाठी निश्चित उपाययोजना करण्याची गरज आहे.
बॉडीमास इंडेक्स सतत तपासा
ओबेसिटी एक असा आजार आहे की त्यामुळे शरीराला अनेक व्याधी जडण्याची शक्यता असते. ओबेसिटीचे प्रमाण वजन आणि उंचीनूसार आलेल्या बॉडीमास इंडेक्स BMI इंडेक्सद्वारे ठरविले जाते. त्यामुळे आपला बॉडीमास इंडेक्स सतत तपासत राहायला हवा असे म्हटले जात आहे. एक्सरसाईड आणि डायटींगच्या मदतीने आपण आपले शरीर फिट राखण्यास मदत होत असते. शरीराच्या आवश्यकते पेक्षा जास्त कॅलरी जर आपण सेवन केली तर त्याचे रूपांतर चरबीत होत असते, बदलती जीवनशैली आणि आहार यामुळे लठ्ठपणामध्ये सारखी वाढ होत आहे.