मुंबई, पत्ता कोबी (Cabbage) ही बाराही महिने उपलब्ध असलेली भाजी आहे. रेस्टोरेंटमध्ये काही पदार्थांसोबत कच्ची पत्ता कोबी देण्यात येते. याशिवाय सूप, भाजी, सॅलड किंवा सँडविच इत्यादीमध्ये पत्ता कोबी पदार्थांची चव वाढविते तसेच अनेकांच्या घरी वेगवेगळ्या प्रकारे पत्ता कोबीची भाजी बनविण्यात येते. पत्ता कोबीचे अनेक आरोग्यदायी फायदे (Health Benefits) आहेत. जाणून घेऊया पत्ताकोबीचा आहारात समावेश केल्याने कोणकोणते फायदे मिळतात.
कोबीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी हे फायदेशीर आहे. तसेच शरीराला लोह शोषण्यास मदत होते. रोगप्रतिकारशक्ती व्यतिरिक्त, कोबी कोलेजन वाढवण्यासाठी देखील उपयुक्त आहे.
फायबर आणि प्लांट स्टेरॉल भरपूर असल्याने कोबी खाल्ल्याने पचनास मदत होते. यामुळे चांगल्या बॅक्टेरियाची वाढ होण्यास मदत होते आणि शरीराला इतर आवश्यक पोषक तत्वे देखील मिळतात.
शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल म्हणजेच एलडीएल कमी करण्यासाठी कोबी खाऊ शकता. पचन सुधारण्यासोबतच यामध्ये असलेले फायबर कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यातही देखील प्रभावशाली आहे.
कोबीमध्ये व्हिटॅमिन के आढळते. हे शरीर निरोगी ठेवण्यासाठी हे उपयुक्त आहे. यामुळे हाडे मजबूत होतात आणि रक्त गोठण्याची समस्या उद्भवत नाही. यासाठी, तुम्हाला कोबी जास्त खाण्याची गरज नाही, परंतु आठवड्यातून एक किंवा दोनदा तिचा आहारात समावेश करावा.
लाल कोबी पोटॅशियमचा चांगला स्रोत आहे. हे खाल्ल्याने उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होते. याशिवाय रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारते ज्यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते.