नवी दिल्ली – मटण किंवा मांसामध्य प्रोटीन (proteins) भरपूर प्रमाणात असते. लोकांना असा विश्वास आहे की ते जितके जास्त मांस (meat) खातील तितकी जास्त प्रोटीन्स मिळतील, परंतु प्रोटीन्सासाठी फक्त मांसावर अवलंबून राहणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. विशेषतः ॲनिमल प्रोटीन हाडे कमकुवत करू शकतात. अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की ॲनिमल-बेस्ड प्रोटीन्स (animal based protein)ही प्लांट-बेस्ड प्रोटीन्सपेक्षा हाडं अधिक कमकुवत करतात. अनेक संशोधनांनुसार, जे लोक भरपूर मांस खातात, त्यांना ऑस्टिओपोरोसिस आणि फ्रॅक्चर होण्याची शक्यता अधिक असते.
मांसाहारामुळे खरंच हाड कमजोर होतात का ?
ॲनिमल-बेस्ड प्रोटीन्स किंवा प्लांट-बेस्ड प्रोटीनच्या वापरामुळे हाडांवर कसा परिणाम होतो, याबद्दल आहारतज्ज्ञांनी काही गोष्टी स्पष्ट केल्या. हाय प्रोटीन्स असलेला आहार हा आपल्या हाडांच्या आरोग्यावर परिणाम करू शकतो आणि कॅल्शिअमच्या कमतरतेचेही कारण ठरू शकते. हाडांच्या आरोग्यासाठी प्रोटीन्स महत्त्वपूर्ण आहेत, परंतु जास्त प्रमाणात ॲनिमल-बेस्ड प्रोटीन विशेषत: लाल मांस खाणे हे खरंतर आपल्या हाडांना हानी पोहोचवू शकतात.
ॲनिमल-बेस्ड प्रोटीन हाडांच्या संरचनेसाठी महत्त्वाचे असते. हाडांच्या आरोग्यासाठी प्रोटीन्स आवश्यक असतात, मात्र त्याचे प्रमाण लक्षात न घेतल्यास त्याचे नकारात्मक परिणामही होऊ शकतात. त्यामुळे प्रोटीनच्या सेवनासाठी केवळ लाल मांसावर अवलंबून राहू नये, तर दुग्धजन्य पदार्थ, मासे, चिकन आणि प्लांट-बेस्ड प्रोटीन्स स्त्रोतांचा आहारात समावेश करावा.
प्रोटीनसाठी मांसावर अवलंबून राहणे चुकीचे आहे
प्रोटीनच्या सेवनामध्ये भरपूर फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्य यांचा समावेश असावा. पोषणतज्ञांच्या मते, मांसामध्ये फॉस्फरस-कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे कॅल्शियमचे उत्सर्जन आणि हाडांचे अखनिजीकरण वाढते. आवश्यक खनिजांच्या कमतरतेमुळे ते होऊ शकते.
आहारात समतोल राखणे गरजेचे आहे
मात्र, प्लांट बेस्ड आणि ॲनिमल-बेस्ड प्रोटीन दोन्ही प्रोटीन्समध्ये अमीनो ॲसिडची रचना वेगळी असल्याने ते एकमेकांच्या जागी वापरले जाऊ शकत नाहीत. पण त्यांच्यामध्ये संतुलन राखले जाऊ शकते. जास्त प्रमाणात लाल मांस खाल्ल्याने मधुमेह, हृदयविकार आणि कर्करोगाचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत आहारात कोणतेही मोठे बदल करण्यापूर्वी आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणे चांगले.