नारळाचं पाणी आरोग्यासाठी चांगलं असतं. आजारपण असो वा नसो नारळ पाणी पिणं कधीही चांगलं. आजारी पडल्यावर डॉक्टरही नारळ पाणी पिण्याचा सल्ला देत असतात. पण नारळ पाणी कोणत्या सीजनमध्ये प्यावे हे अनेकांना समजत नाही. थंडीच्या दिवसात म्हणजे हिवाळ्यात नारळ पाणी प्यायलं पाहिजे का? असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यावरच आज आपण प्रकाश टाकणार आहोत. नारळ पाणी हिवाळ्यात प्यावं की नाही? त्याचे काय आहेत फायदे आणि तोटे? चला तर मग जाणून घेऊया…
केवळ आजारी असताना आणि उन्हाळ्यातच नारळ पाणी प्यायलं पाहिजे असा अनेकांचा समज आहे. नारळ थंड असते. त्यामुळे उन्हाळ्यात नारळ पाणी प्यायल्याने उष्माघातासह अनेक आजारापासून दिलासा मिळतो असंही असंही अनेकांना वाटतं. पण उन्हाळ्यातच नव्हे तर तुम्ही थंडीच्या दिवसातही नारळ पाणी पिऊ शकता. हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे असंख्य फायदे आहेत. ते समजून घेतले पाहिजे.
हवेतील आर्द्रता सातत्याने कमी होऊन हिवाळ्यात हवेतील ओलावा कमी होतो. त्यामुळे डिहायड्रेशन (शरीरात पाणी कमी होणे) होण्याचा धोका वाढतो. अशावेळी जर तुम्ही रोज नारळाचे पाणी पित असाल, तर तुम्हाला डिहायड्रेशनची समस्या कधीच होणार नाही. हिवाळ्यात नारळाचे पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहते.
हिवाळ्यात अनेक लोकांना त्वचेशी संबंधित समस्या ग्रास्तात. त्वचेचा कोरडेपणा ही त्यातील महत्त्वाची समस्या असते. नारळाचे पाणी त्वचेला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते. यातील अँटीऑक्सिडंट्स शरीराला थंड आणि तापापासून दूर ठेवण्यास मदत करते. त्याचप्रमाणे, नारळाच्या पाण्यात असलेल्या फायबर्स तुमच्या पाचन प्रणालीला देखील उत्तम प्रकारे कार्यरत ठेवतात.
नारळाचे पाणी शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवण्यास उपयुक्त असते. त्यामुळे हिवाळ्यातही त्याचा फायदा होतो. वजन वाढत असल्याबद्दल तुम्ही चिंतीत असाल तर नारळाचे पाणी प्यायल्याने तुमचे वजन नियंत्रणात राहते. कारण त्यात कॅलरीज अधिक असतात.
नियमितपणे नारळाचे पाणी प्यायल्यास तुमची चहा आणि कॉफीचे पिण्याची सवय सुटेल. परिणामी तुमचे कॅफिनचे सेवन कमी होईल. शरीरासाठी ते उत्तमच ठरेल. यामध्ये पुरेशी प्रमाणात मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि पोटॅशियम असतो. पोटॅशियम शरीरातील सोडियमच्या स्तराचे संतुलन राखण्यास मदत करते आणि रक्तदाबाचे नियंत्रण सुधारते.
नारळाच्या पाण्यात असलेले नैसर्गिक शर्करा आणि इलेक्ट्रोलाइट्स शरीराला ऊर्जा देण्यास मदत करतात. हिवाळ्यातही त्याची ऊर्जा वाढवण्याची भूमिका महत्वाची असते. ते शरीराला ताजेतवाने ठेवते.